चेन्नई – तमिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्णाद्रमुक पक्षांमध्ये खरी लढत असली तरी विरोधक उमेदवारच पंतप्रधान मोदी यांना आपल्या विरोधात प्रचारसभा घेण्याचे आव्हान करत आहेत. द्रमुक उमेदवारांकडून दिल्या जात असलेल्या उपहासात्मक पद्धतीने दिलेल्या या आव्हानाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी भाजप किंवा अण्णाद्रमुकच्या उमेदवारांचा प्रचार करावा, जेणेकरून आमच्या मताधिक्यात वाढ होईल, असा टोमणा पंतप्रधानांना ट्विटरवर टॅग करून काही उमेदवारांनी मारला आहे. विशेषतः कुमबुम विधानसभा मतदारसंघातील द्रमुकचे उमेदवार एन. रामकृष्णा ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून, ‘ तुम्ही कुम्बुम विधानसभेत प्रचार करा, मी येथे द्रमुकचा उमेदवार आहे. तुमच्या प्रचारामुळे माझे मताधिक्य वाढण्यास मदत होईल, असे आव्हान त्यांनी दिले आहे.









