नवी दिल्ली – जगात अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडत असतात. त्यातीलच एक म्हणजे ब्राझिल. अॅमेझॉनच्या जंगलासाठी जसा तो प्रसिद्ध आहे तसाच तो सापांसाठी देखील प्रसिद्ध आहे. येथे निरनिराळ्या प्रकारचे इतके साप आढळतात की, तो सापांचा देश म्हणूनच ओळखला जातो. तर दुसरीकडे आयर्लंड हा असा देश आहे, की जेथे साप अजिबातच आढळत नाहीत.
आयर्लंड येथे साप न आढळण्यामागे एक पौराणिक कथा आहे. ख्रिश्चन धर्माच्या सुरक्षेसाठी येथे एक संत आले होते, सेंट पॅट्रिक. त्यांनी या संपूर्ण देशातील सापांना एकत्र केले आणि त्यांना समुद्रात फेकून दिल्याचे सांगितले जाते. तब्बल ४० दिवस उपाशी राहून त्यांनी हे कामी केले. म्हणूनच येथे एकही साप आढळत नाही, अशी मान्यता आहे. वैज्ञानिकांना मात्र हे मान्य नाही. त्यांच्या मते, आयर्लंड येथे कधीही साप नव्हते. येथे साप होते, अशी कोणतीही माहिती जिवाष्म विभागाकडे नाही. याचबरोबर सुरुवातीला येथे साप होते, पण येथील अत्याधिक थंडीमुळे ते नष्ट झाल्याची कहाणी देखील प्रचलित आहे.
केवळ सापच नव्हे तर येथील अजूनही अनेक गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. येथे मानवी अस्तित्वाच्या खुणा फार पूर्वीच्या म्हणजे इसवी सनापूर्वी १२८०० मधील आढळतात. येथे एक बार आहे. विशेष म्हणजे तो ९०० व्या शतकातील आहे. आणि तो आजही सुरु आहे. त्याचे नाव आहे सीन्स बार.
पृथ्वीवर आज जेवढी ध्रुवीय अस्वले आढळतात त्यांचे पूर्वज शोधले तर ते ५० हजार वर्षांपूर्वीच्या एका भुरी मादी अस्वलाची पिल्ले आहेत. जगातील सर्वात मोठे जहाज, टायटॅनिक ज्याला जलसमाधी मिळाली होती. ते जहाज आयर्लंडमधील बेलफास्ट शहरात बांधण्यात आले होते.