इंदूर – तुम्हाला रुबिक क्यूब माहीत असेलच. अनेकांना तो सोडवणं जमत नाही. पण, इंदूर येथील तनिष्का ही मुलगी तर चक्क डोळ्यांवर पट्टी बांधून हा क्यूब सोडवते. एवढंच नाही तर डोळे झाकून ती लिहू, वाचू शकते, असा तिचा दावा आहे. या मुलीची ही बुद्धिमत्ता भल्याभल्यांना हैराण करते आहे.
तिच्या या वेगळेपणाची दखल आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली आहे. मी दहावीची परीक्षा ११ व्या वर्षी दिली तर बारावीची परीक्षा बाराव्या वर्षी दिली. आणि आता १३ व्या वर्षी मी अहिल्या विद्यापीठातून पुढील शिक्षण घेत असल्याचे तनिष्का हिने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले. तिचे हे कौशल्य आणि ज्ञान पाहून सारेच अचंबित होत आहेत. म्हणूनच तिची सर्वत्र चर्चा आहे.
https://twitter.com/ANI/status/1357002198060683264