मुंबई – जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेवर गेल्या दोन दशकांमध्ये कर्जाचा बोजा कमालीचा वाढला आहे. विशेष हे की भारताचेही अमेरिकेवर २१६ अरब डॉलरचे (१५ लाख कोटी रुपये) कर्ज आहे.
अमेरिकेच्या डोक्यावर एकूण २९ ट्रिलीयन डॉलरचे कर्ज आहे. एका अमेरिकन खासदाराने सरकारला वाढत्या कर्जावरून अलर्ट केले आहे. कारण चीन आणि जपानचे अमेरिकेवर सर्वाधिक कर्ज आहे.
२०२० मध्ये अमेरिकेचा एकूण राष्ट्रीय कर्ज भार २३.४ ट्रिलीयन डॉलर होता. याचाच अर्थ असा आहे की प्रत्येक अमेरिकेवर ७२ हजार ३०९ डॉलर म्हणजे ५३ लाख रुपयांचे कर्ज आहे. अमेरिकन खासदाराने म्हटले आहे की, ‘आमचे कर्ज वाढून २९ ट्रिलीयन डॉलरपर्यंत पोहोचले आहे. अर्थात प्रत्येक व्यक्तिवरील कर्जाचा बोजाही वाढत आहे. कर्जाच्या बाबतीतील माहिती इतकी संभ्रम निर्माण करणारी आहे की हा पैसा जात कुठे आहे, हेही कळू शकत नाहीये.’
चीन आणि जपान मोठी कर्जदाता
चीन आणि जपान आमचे सर्वांत मोठे कर्जदाता आहे, मात्र ते वास्तवात ते आमचे मित्र नाहीत, असेही या खासदाराने म्हटले आहे. अमेरिकेतील प्रतिनिधी सभेत बायडेन सरकारच्या जवळपास दोन ट्रिलीयन डॉलरच्या प्रोत्साहन पॅकेजचा विरोध करीत वेस्ट व्हर्जिनीयाचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार मूनी यांनी चीनपासून सावध राहण्याचा इशाराही दिला आहे.
चीन आणि जपानचे एक ट्रिलीयन डॉलरपेक्षाही अधिक कर्ज आमच्या डोक्यावर आहे. जे देश आपल्याला कर्ज देत आहेत त्यांचे कर्ज आपल्याला चुकवायचेही आहे. ज्या देशांनी कर्ज दिले ते प्रत्येकवेळी आपल्या हिताचाच वापर करतील, असेही नाही, असेही मूनी यांनी म्हटले आहे.
भारताचे २१६ अरब डॉलर
अमेरिकेला ब्राझीलचे २५८ अरब डॉलर द्यायचे आहे. भारताचे २१६ अरब डॉलर द्यायचे आहे. अमेरिकेला कर्ज देणाऱ्या देशांची यादी मोठी आहे. २००० साली अमेरिकेवर ५.६ ट्रिलीयन डॉलरचे कर्ज होते. ओबामांच्या कार्यकाळात हे कर्ज दुप्पट झाले.