सॅनफ्रान्सिस्को – एका लिलावादरम्यान ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांचे पाहिले ट्विट तब्बल १७.३७ कोटींना विकले गेले. विशेष म्हणजे, त्यांनी ही रक्कम अफ्रिकेतील एका संस्थेला बिटकॉईनच्या स्वरूपात दान दिली आहे. या ट्विटला नॉन फंजीबल टोकन (एनएफटी) च्या रुपात आर्टचा दर्जा मिळाला आहे.
डोर्सी यांनी सांगितले की, लिलावातून मिळालेली ही रक्कम बिटकॉईनमध्ये रूपांतरित करून अफ्रिका रिस्पॉन्स या एजन्सीला देण्यात येणार आहे. डोर्सी यांच्या ट्विटला एनएफटीचा दर्जा मिळाला आहे.
‘जस्ट सेटिंग अप माय ट्विटर’, हे ट्विट डोर्सी यांनी मार्च २००६ मध्ये केले होते. ब्रिज ओरॅकल या टेक कंपनीचे सीईओ सीना एस्तावी यांनी विकत घेतले आहे.
एनएफटी या डिजिटल वस्तू आहेत. एथरीयम ब्लॉकचेनच्या माध्यमातून या गोष्टी प्रमाणित केल्या जातात. ही प्रमाणित करण्याची प्रक्रिया डिजिटल वस्तूंच्या मालकाकडूनच केली जाते. आणि हे डिजिटल सर्टिफिकेट म्हणून वापरले जाते.