लंडन – कोरोनाविरूद्ध सुरू असलेला लढा यशस्वी ठरविण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक जोरदार प्रयत्न करत आहेत. या लढाईत ब्रिटिश शास्त्रज्ञांना मोठे यश आले आहे. या शास्त्रज्ञांनी नाकाद्वारे फवारणी औषधला (नोजल स्प्रेला) अंतिम रूप दिले असून ते कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी ठरू शकते.
या नोजल स्प्रेमुळे दोन दिवस कोरोनो संसर्ग रोखला जावू शकतो. बर्मिंहम विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी हा स्प्रे विकसित केला असून. हे औषधांच्या दुकानांमध्ये काही महिन्यांत उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. या संबंधी अभ्यासाचे अग्रगण्य संशोधक डॉ. रिचर्ड मोक्स यांनी सांगितले की, नवीन नोजल फवारणीच्या सूत्रानुसार आत्मविश्वास आहे की यामुळे कोरोना रोखण्यास मदत होईल, जेणेकरून लोक शारीरिक अंतरासारख्या सावधगिरीपासून मुक्त होऊ शकतील.
या नोजल स्प्रेला अद्याप नाव देण्यात आले नाही. मात्र हे लोक वापरण्यासाठी सुरक्षित असून यासाठी पुढील मंजुरीची आवश्यकता नाही. या अभ्यासात असे आढळले आहे की स्प्रे कोरोनाला ४८ तासापर्यंत पसरण्यापासून प्रतिबंधित करते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, दिवसातून चार वेळा हे स्प्रे वापरल्यास कोरोनापासून संरक्षण होईल. इतकेच नव्हे तर दर २० मिनिटांसाठी शाळा आणि अन्य दाट लोकवस्तीच्या ठिकाणी हे वापरले जाऊ शकते. या नोजल स्प्रेमध्ये वापरल्या गेलेल्या औषधामुळे विषाणूचा नाश होतो आणि त्याचे संक्रमण टाळण्यास मदत होते.