नाशिक – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काय चर्चा झाली, काय निर्णय घेण्यात आले, त्याची माहिती भुजबळ यांनी दिली.
भुजबळ म्हणाले की,
-
राज्यातील स्थितीवर मंत्रिमंडळात चर्चा
-
सर्व प्रकारच्या पर्यायांवर चर्चा झाली
-
लॉकडाऊन लावण्याचा पर्याय असला तरी आपण अन्य पर्यायांचा शोध घेत आहोत
-
यापुढे हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही
-
राज्यात लॉकडाऊन नाही पण अत्यंत कडक निर्बंध
-
उद्या (सोमवार) रात्री १२ वाजेपासून निर्बंध लागू होतील
-
शनिवार आणि रविवार पूर्णपणे लॉकडाऊन असेल. फक्त जीवनावश्यक बाबी सुरू राहतील
-
सरकारी कार्यालयातील उपस्थिती ५० टक्केच असेल
-
जीवनावश्यक बाबींशी निगडीत सर्व कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहतील
-
समारंभ सर्व बंद राहतील
-
मास्क नसेल तर ५०० रुपये दंड असेल
-
लसीकरणावर अधिकाधिक भर असेल
-
१५ एप्रिलपासून पुढे कोरोना बाधितांची संख्या अधिक वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे
-
दळणवळण सुरू राहिल. जिल्हा बंदी मात्र राहणार नाही
-
मॉल, सिनेमागृहे, वॉटरपार्क पूर्णपणे बंद असणार
-
बार, रेस्टॉरंट, हॉटेलवर अधिक निर्बंध येणार
(सविस्तर वृत्त लवकरच)
ही पत्रकार परिषद इंडिया दर्पणच्या फेसबुक पेजवर थेट प्रक्षेपित करण्यात आली. त्याची लिंकही सोबत देत आहोत.
https://www.facebook.com/watch/?v=280434436883419