नाशिक – नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालयात बायोमेट्रिक थम कार्यन्वित करण्यात आला आहे. यामुळे कामचुकारांना मोठा दणका मिळाला आहे. अनेकदा नागरिक कार्यालयात येतात मात्र कर्मचारी वेळेवर येत नाहीत किंवा वेळेपूर्वीच कार्यालयातून पसार होतात. या साऱ्या प्रकारांना आळा बसावा आणि कर्मचारी दर्तव्यदक्ष व्हावेत यासाठी ही प्रणाली बसविण्यात आली आहे.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात ‘बायोमेट्रिक थम’ प्रणालीचे आज (१ जानेवारी) उदघाटन करण्यात आले. यावेळी उपायुक्त अर्जुन चिखले, उपायुक्त अरविंद मोरे ,अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या प्रणालीमुळे कामकाजात पारदर्शकता येणार आहे. कर्मचारी व अधिकारी यांच्या कार्यालयातील येण्या आणि जाण्याच्या वेळांची ऑनलाईन नोंद होईल.