सिटूच्या निवेदनाची दखल घेत झाला निर्णय
नाशिक ः कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत लवकरच कामगार मंत्र्यांसोबत बैठक घेतली जाणार आहे. सीटूने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यासंदर्भात निवेदन दिले होते. त्याची दखल पवार यांनी घेतली. आणि बैठकीबाबत सीटूचे नेते डॉ. डी एल कराड यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली आहे.
पवार हे नाशिक दौऱ्यावर असताना डॉ कराड यांनी पवार यांना निवेदन देऊन राज्यातील कामगारांच्या प्रश्नाबाबत लक्ष घालण्याची विनंती निवेदनाद्वारे केली होती. आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर कामगार विषयक त्परिक्षीय समित्या गठित केलेल्या नाहीत व अनेक मंडळे (सुरक्षा रक्षक मंडळ माथाडी मंडळ) फक्त अधिकाऱ्यांमार्फत चालविली जात आहेत. या सर्व कामगार विषयक त्रिपक्षीय समित्या आणि मंडळावर राष्ट्रीय कामगार संघटनांचे प्रतिनिधी घेण्यात यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली होती. तसेच, यासंदर्भात कामगार मंत्र्यांकडे बैठक घ्यावी, अशी विनंती केली होती. त्यानुसार ही बैठक होणार असून त्यास पवार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत.