गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कामगार नगरला धाडसी घरफोडी, भरदिवसा साडे बारा लाखाच्या तिजोरीवर डल्ला

by India Darpan
जानेवारी 14, 2021 | 10:30 am
in क्राईम डायरी
0
crime diary 2

कामगार नगरला धाडसी घरफोडी, भरदिवसा साडे बारा लाखाच्या तिजोरीवर डल्ला
नाशिक :
कामगार नगर भागातील एका डॉक्टरचे घर फोडून चोरट्यांनी तिजोरी पळविली. भरदिवसा झालेल्या धाडसी चोरीत चोरट्यांनी तब्बल साडे बारा लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात ११ लाखाच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेंद्र बाबुराव पाटील (रा. मधुमैत्री अपा.वनविहार कॉलनी जवळ कामगारनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटील यांचा वैद्यकीय व्यवसाय असून, बुधवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास ते रूग्णसेवेसाठी घराबाहेर पडले होते तर त्यांच्या पत्नी आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी गेल्या असता ही घटना घडली. पाटील दांम्पत्य घरात नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचे लॅच लॉक तोडून बेडरूम मधील लाकडी कपाटात बसविलेली तिजोरी पळविली. या तिजोरीत रोकडसह दागिणे असा सुमारे १२ लाख ४८ हजाराचा ऐवज होता. भरदिवसा झालेल्या या धाडसी घरफोडीमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक नागरे करीत आहेत.

…….

शरणपूररोडला सव्वा लाखाची घरफोडी
नाशिक : शरणपूर रोड भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह चांदीच्या धातूने घडलेली भांडी आणि देवदेवतांच्या मुर्तींचा समावेश आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन गुलाबचंद राठी (४५ रा.पार्क अव्हेन्यु,साधू वासवाणीरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. राठी कुटूंबिय १५ नोव्हेंबर ते १२ जानेवारी दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातून २० हजाराची रोकड व देव घरातील चांदीची भांडी आणि देवदेवतांच्या भरीव मुर्त्या असा सुमारे १ लाख २० हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक संदिप पवार करीत आहेत.

………..
भररस्त्यात हॉटेल व्यावसायीकास लुटले
नाशिक : वाहनाचा हॉर्न वाजविल्याच्या कारणातून दुकलीने हॉटेल व्यावसायीकास मारहाण करीत लुटल्याची घटना देवळाली गावातील राजवाडा भागात घडली. संशयीतामध्ये एका गुन्हेगाराचा समावेश असून या घटनेत संशयीतांनी हॉटेल मालकाच्या खिशातील रोकड आणि मोबाईल पळविला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समिर जमिल शेख व सिध्दांत धनेदर (रा.दोघे राजवाडा,देवळाली गाव) अशी हॉटेल व्यावसायीकास लुटणाºया दुकलीचे नाव आहे. याप्रकरणी बंटी कन्हैय्या दासवाणी (रा.सोमानी गार्डन समोर,एम.जी.रोड ना.रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयीतांपैकी सिध्दांत धनेदर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द नाशिकरोड आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. हॉटेल व्यावसायीक दासवाणी बुधवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास आपल्या वाहनातून हॉटेलच्या दिशेने प्रवास करीत असतांना ही घटना घडली. खंडेराव मंदिराजवळ रस्त्यात अचानक उंट आल्याने दासवाणी यांनी आपल्या वाहनाचा हॉर्न वाजविला असता संशयीतांनी त्यांना गाठून हॉर्न वाजविण्याचा जाब विचारला. यावेळी संतप्त दुकली पैकी एकाने जवळ पडलेला दगड उचलून दासवाणी यांच्या डोक्यात हाणला. दासवाणी जखमी झाल्याने संशयीतांनी त्यांच्या खिशातील चार हजार रूपयांची रोकड आणि मोबाईल काढून पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेळके करीत आहेत.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काय ही अमानुषता; सासरच्यांनी महिलेचे स्तन, नाक आणि जीभ कापली

Next Post

भूखंड खरेदी विक्री व्यवहारातील वाढीव रकमेवरून तिघांनी केली मायलेकास मारहाण

India Darpan

Next Post
crime diary 2

भूखंड खरेदी विक्री व्यवहारातील वाढीव रकमेवरून तिघांनी केली मायलेकास मारहाण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011