दिंडोरी – देशांतर्गत अतिरिक्त साखर निर्मिती होत असल्याने साखरेला भाव व उठाव नाही. अशा परिस्थितीत केवळ साखर निर्मिती करून साखर कारखाने चालणे अवघड आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मिती ही करावीच लागणार असून त्यादृष्टीने कादवाने सर्व तयारी केली आहे. लवकरच डिस्टीलरी इथेनॉल प्रकल्प सुरू करणार असल्याची घोषणा कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केली.
कादवा सहकारी साखर कारखान्याचे ४४ व्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ चेअरमन श्रीराम शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झाला त्यावेळी ते बोलत होते.यावेळी बॉयलर अग्निप्रदीपन पूजा विठ्ठल संधान,बाळासाहेब आथरे व अशोक भालेराव यांचे हस्ते करण्यात आली. यावेळी शेटे यांनी कारखान्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. साखर उतारा उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक असून एफआरपी ही सर्वात जास्त आहे. गाळप क्षमता कमी असल्याने सर्वांचा ऊस वेळेत गाळप करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे गाळप क्षमता २५०० मेट्रिक टन करण्यात आली आहे. नियोजनबद्ध ऊस तोडणी कार्यक्रम आखत जास्तीत जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे शेटे यांनी स्पष्ट केले. अतिरिक्त साखर उत्पादन होत असल्याने सरकारने इथेनॉल निर्मितीला चालना दिली आहे. त्याचा फायदा घेणे अत्यावश्यक आहे. कादवा डिस्टीलरी व इथेनॉल प्रकल्पास सरकारने परवानगी दिली आहे. हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होईल, असे शेटे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील,माजी संचालक संजय पडोळ, नरेश देशमुख, युनियन अध्यक्ष दत्तात्रेय वाकचौरे आदींची भाषणे झाले. प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी स्वागत केले. संचालक शहाजी सोमवंशी यांनी प्रास्ताविक केले. संचालक बाळासाहेब जाधव यांनी आभार मानले.
उपाध्यक्ष उत्तमबाबा भालेराव, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, संचालक मधुकर गटकळ, त्र्यंबक संधान, बापू पडोळ, दिनकर जाधव, सुनील केदार, विश्वनाथ देशमुख, शिवाजीराव बस्ते, सुकदेव जाधव, सुभाष शिंदे, संदीप शार्दूल, चंद्रकला नामदेव घडवजे, शांताबाई रामदास पिंगळ, साहेबराव पाटील, संपतराव कोंड, शेखर देशमुख, बबन देशमुख, विलास वाळके, उपसभापती अनिल देशमुख, जिप सदस्य भास्कर भगरे, प्रकाश पिंगळ, बाकेराव पाटील, मच्छीन्द्र पवार, दत्तात्रेय जाधव, अशोकराव वाघ, विजय वाघ, भास्करराव निखाडे, राजेंद्र ढगे, रामदास पाटील, संपतराव घडवजे, गुलाबराव जाधव, नरेश देशमुख, भास्करराव वसाळ, सुनील थोरात, रघुनाथ दिघे, राजेंद्र उफाडे, शाम हिरे, डॉ योगेश गोसावी, दत्तात्रेय गटकळ, संतोष रेहरे, गंगाधर निखाडे, दत्तात्रेय संधान, त्रंबकराव नाठे, छबु मटाले, सुरेश बोरस्ते, महंमद सय्यद, प्रभाकर उफाडे, सुनील पाटील दवंगे, अनिल ठुबे, पंढरीनाथ संधान, सुनील पाटील, शिवाजी दळवी, खंडेराव दळवी, वसंतराव मोगल, विष्णू दळवी आदींसह सर्व अधिकारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डिस्टीलरी व इथेनॉल प्रकल्पासाठी ठेवी देण्याचे आवाहन
कादवाने डिस्टीलरी व इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याची पूर्ण तयारी केली आहे. त्याच्या उभारणीसाठी आवश्यक कर्ज मिळविण्यासाठी काही रक्कम निधी उभारावा लागणार आहे. त्यासाठी सभासद व शेतकऱ्यांनी कारखान्याकडे प्रत्येकी रु. पाच हजार ठेव ठेवावी, असे आवाहन शेटे यांनी केले.