मनमाड- चार दिवसाच्या सुट्टीनंतर बुधवारी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव सुरु झाल्यानंतर कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली. कांद्याला प्रती क्विंटल कमीतकमी २०० रुपये तर जास्तीतजास्त ६९७ तर सरासरी ५५० रुपये भाव मिळाला. कांद्या आणण्यासाठी वाहतुकीला लागणारा खर्च देखील वसूल होत नसल्याचे पाहून बळीराजा हवालदिल झाला.
लासलगाव बाजार समितीपेक्षा मनमाड बाजार समितीत कांद्याच्या कमी भाव मिळत असून या दोन बाजार समितीच्या भावात क्विंटल मागे १५० ते २५४ रुपये पर्यंत फरक असल्याचे पाहून शेतकरी संतप्त झाले. लासलगावचे व्यापारी कांद्याला चांगला भाव देत असतांना मनमाडला कमी भाव का ? असा प्रश्न कांदा उत्पादक शेतक-यांना पडला आहे. बाजार समिती प्रशासन आणि संचालक मंडळाने यात लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली आहे