लासलगांव – कांद्याची आवक घटल्यामुळे कांद्याचे भाव गेल्या काही दिवसापासून वाढले होते. पण, बुधवारी या भावात ११ रुपयांनी घसरण झाली. सकाळी लिलाव सुरु होताच हे भाव कमी झाल्याचे चित्र होते. मंगळवारी ६९ रुपये इतका भाव मिळाला होता बुधवारी ५८ रुपये प्रति किलो भाव मिळाला. जिल्ह्यातील बहुतांश बाजार समितीमध्ये थोडीफार अशीच स्थिती आहे. इराणसह काही देशातून कांदा आयत केला जात असल्याने भाव कमी झाल्याचे बोलले जात आहे
मंगळवारचे भाव प्रति क्विंटल
कमीतकमी – १५०० रुपये
जास्तीतजास्त- ७५०० रुपये
सरासरी – ६९०० रुपये
बुधवारचे भाव क्विंटल
कमीतकमी- १००० रुपये
जास्तीतजास्त-७१०२ रुपये
सरासरी- ५८०० रुपये
प्रति क्विंटल भावात घसरण
कमीतकमी- ५०० रुपये
जास्तीतजास्त- ३९८ रुपये
सरासरी – ११०० रुपये