नाशिक – कांद्याचे भाव वाढत असतानाच केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणल्याने त्याचे पडसाद सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. खासदार डॉ. भारती पवार यांनी हा प्रश्न लोकसभेत मांडला. कांदा निर्यात बंदीचा अध्यादेश रद्द करावा आणि कांदा निर्यात खुली करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासह सभागृहाचे लक्ष त्यांनी वेधले.