पिंपळगाव बसवंत – कांद्याचे वाढलेले भाव नियंत्रणात राहावे, यासाठी केंद्र सरकारने कांदा साठेबाजीवर निर्बंध घातलेले आहेत. घाऊक व्यापाऱ्यांना २५ टन व किरकोळ व्यापाऱ्यांना २ टनापर्यंत कांदा साठवणुकीची मर्यादा ठरवून दिल्याने व्यापाऱ्यांना व्यापार करण्यास अडचण येईल म्हणून व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये सोमवारी (दि. २६) व्यापा-यांनी लिलाव बेमुदत बंद ठेवले. या निर्णयामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होणार आहे.
ॉ
ॉ
केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर दोन टनापर्यंत मर्यादा घातल्याने या निर्णयाविरोधात व्यापा-यांनी बुदत संपाचे हत्यार उगारले. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, मनमाड, नांदगांव, चांदवड, येवला आदी बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बेमुदत बंद राहणार आहेत. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहे. कांद्याला सध्या चांगला भाव मिळत असतांना या सर्व घटनाक्रमामुळे कांद्याचे भाव घसरणार असून, शेतकऱ्याला त्याचा फटका बसणार आहे.
व्यापा-यांच्या निर्णयाला शेतक-यांचा पाठींबा
दोन टनापर्यंत कांदा साठवणुकीची मर्यादा व्यापार्यांवर लादल्याने व्यापारी जास्त माल खरेदी करू शकत नाही. त्याचा परिणाम कांदा दरावर होऊन शेतकर्यांचे नुकसानच होणार आहे. त्यामुळे व्यापार्यांच्या भूमिकेला शेतक-यांनी पाठींबा दिला आहे.

लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला
कांदा साठवणुकीवर निर्बंध आणल्याने व्यापारी वर्गात नाराजी आहे. या निर्णयामुळे व्यापा-यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
– बाळासाहेब बाजारे, सचिव, पिंपळगाव बसवंत बाजार समिती
कांदा साठवणुकीवर निर्बंध आणल्याने व्यापारी वर्गात नाराजी आहे. या निर्णयामुळे व्यापा-यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
– बाळासाहेब बाजारे, सचिव, पिंपळगाव बसवंत बाजार समिती
….
तोपर्यंत लिलाव बंदच
कांदा साठवणुकीवर निर्बंध आणल्याने व्यापारी जास्त कांदा खरेदी करू शकत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम बाजार भावावर होऊन शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे. जोपर्यंत हा निर्णय मागे घेण्यात येणार नाही, तोपर्यंत लिलाव बंदच राहतील.
– अतुल शहा, कांदा व्यापारी, पिंपळगाव बसवंत

…
केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फटका
केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फटका
केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फटका आम्हाला मोठ्या प्रमाणात बसतो आहे. त्यामुळे जोपर्यंत निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत कांदा विक्रीसाठी नेणार नाही.
– गणेश शार्दुल, शेतकरी, दिंडोरी
– गणेश शार्दुल, शेतकरी, दिंडोरी