पिंपळगाव बसवंत : कांदा साठवणुकीवर केंद्र सरकारने निर्बंध लादले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील घाऊक आणि किरकोळ व्यापा-यांनी कांदा लिलाव सोमवारपासून बंद ठेवले आहे. मात्र, अनेक व्यापा-यांचा साठवलेला कांदा बाहेर जात आहे. त्यामुळे व्यापा-यांनी लिलाव सुरू न केल्यास त्यांची वाहने अडविण्याचा धमकीवजा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सुभाष आहिरे यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व लहान – मोठ्या कांदा व्यापाऱ्यांना व्हाट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून तसेच प्रसिद्धी पत्रकातून हा इशारा दिला आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा मार्केट लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांची कांदा माल साठवणूक क्षमता संपली असल्याने कांदा सडत आहे. आता कुठे तरी शेतकऱ्यांना दोन पैसे मिळायला लागले होते. पण, शासनाने जाचक अटी घालून दिल्याने व्यापारी वर्गाने कांदा लिलाव बंद ठेवले आहेत. पण व्यापारी वर्गाचा कांदा गाड्या भरून सुरळीत पणे बाहेर विक्रीसाठी जात आहे. मार्केट बंद असल्याने यात शेतकऱ्यांचेच मोठे नुकसान होत आहे. पुढे शेतकऱ्यांचा दीपावली सण येत असल्याने मुला – बाळांना खरेदीसाठी किंवा घरी थोडेफार गोडधड करून पोराबाळांना खाऊ घालू या अपेक्षेत शेतकरी असताना शासनाच्या जाचक अटींमुळे व्यापारी वर्गाने कांदा लिलाव बंद पाडले आहेत. त्यामुळे आहिरे यांनी वेळ पडली तर यावर्षी दीपावली चटणी – भाकरी खाऊन साजरी करू, पण १ नोव्हेंबरपासून नाशिक जिल्ह्यातील सर्व व्यापारी वर्गाने कांदा लिलाव सुरळीत चालू न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना २ नोव्हेंबरपासून नाशिक जिल्ह्यातील कुठल्याही व्यापाऱ्यांचा कांदा माल जिल्ह्याबाहेर जाऊ देणार नाही, असा धमकीवजा इशारा शेवटी आहिरे यांनी दिला आहे.