नाशिक – केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी केल्यानंतर राज्यात त्याचे ठिकठिकाणी पडसाद उमटले आहे. या निर्णयामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहे. लासलगांव येथे बाजार समिती बाहेर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. तर जिल्ह्यात इतर ठिकाणी असे आंदोलन झाले.
लासलगांव येथे आंदोलनानंतर लिलाव सुरू झाले, पाच सहा वाहनांचे लिलाव झाले, पण, दोन हजार रुपयाच्या पुढे भाव जात नसल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. जो पर्यंत तीन हजार रुपये भाव मिळत नाही तो पर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतल्याने लिलाव ठप्प झाला.