नाशिक – केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणल्याच्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी केंद्र सरकार व मोदी सरकारच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर निवडक शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.