नाशिक – कांदा खरेदी करण्यासाठी साठवणूक क्षमता निर्धारित केली होती त्याच्यासाठी नवीन मार्गदर्शिका तयार करण्यात आली असून कांदा खरेदी झाल्यापासून पुढील तीन दिवस कांदा प्रतवारी करून पुढे माल रवाना करण्यासाठी व्यापाऱ्यांना खा.डॉ.भारती पवार यांच्या पाठपुराव्यामुळे वाढीव मुदत दिली असून ह्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी असे आदेश राज्यसरकारला केंद्रासारकरच्या खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना खरेदी केलेल्या मालाची व्यवस्थित प्रतवारी करून तो माल पुढे रवाना करण्यास कुठलीही अडचण येणार नसून रोजचा माल खरेदी केलेल्या मालाला तीन दिवस अवधी स्टॉक लिमिटसाठी अधिकचा मिळणार असल्याचे खा.डॉ.भारती पवार यांनी सांगितले. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, चंद्रकांत दादा पाटील यांचेसह आदींचे खा.डॉ.भारती पवार यांनी आभार मानले.