नवी दिल्ली – काँग्रेस पक्षाने वर्कींग कमिटीच्या पुनर्रचनेचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बरेच फेरबदल करण्यात आले आहेत. तर, प्रभारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पक्षाच्या बैठकीपुर्वी पत्र लिहिणाऱ्या नेत्यांना या कमिटीतून डच्चू देण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समितीत झालेले बदल पुढील प्रमाणे,
- मुकुल वासनिक – स्थान कायम. मध्यप्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी. तसेच, सोनिया गांधी यांना मार्गदर्शन करणाऱ्या समितीत समावेश
- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण – नाव यादीत नाही
- सोनियांची मार्गदर्शन समिती – एकूण ६ जण. त्यात ए के अँटोनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, के सी वेणुगोपाल, मुकुल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला.
- महाराष्ट्र प्रभारी – मल्लिकार्जुन खरगे यांच्याऐवजी एच के पाटील
- महासचिवपदावरुन उचलबांगडी – गुलाब नबी आझाद, अंबिका सोनी, मोतीलाल वोरा, मल्लिकार्जुन खर्गे