नाशिक : काँग्रेसमधील निष्ठावान माळी समाजातील कार्यकर्त्यांना महामंडळ व विधानपरिषद सदस्य निवडीसाठी संदर्भात उत्तर महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. या वेळी चर्चा करतांना राज्यांत माळी समाज हा नंबर दोनचा समाज आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये समाजाची भूमिका निर्णायक आहे. पण उत्तर महाराष्ट्रातील काँगेसमधील माळी समाजातील कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही आजपर्यंत पक्षाचा विधानसभेत एकही सदस्य या विभागातून पोहचलेला नाही.
या विधानसभा निवडणुकीत देखील अनेक मतदारसंघात उमेदवारी मागितलेली होती पण तरीही आघाडी मध्ये तिकीट देखील नाकारले गेले .नाशिक मधील हक्काची काँग्रेसची जागा कवाडे गटाला सोडली त्यांचा उमेदवार काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर ताकदीने लढला नाही. उलट राष्ट्रवादी काँग्रेसने आयात उमेदवार उभा केला. पण आपल्या पक्षाकडे उमेदवारी मागून देखील देण्यात आली नाही. शिक्षक मतदारसंघात देखील उमेदवारी मागितली होती ती देखील दिली नाही.
त्यामुळे काँग्रेस संघटनेला बळकटी मिळवण्यासाठी सर्व घटकांना सोबत घ्यावे लागेल.त्यामुळे उत्तर महाराष्टातून नाशिक,धुळे जळगांव,नंदुरबार या जिल्ह्यातील निष्ठवाण कार्यकर्त्यांना संधी द्यावी जेणेकरून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला त्याचा लाभ होईल असे मत यावेळी शिष्टमंडळाने व्यक्त केले .एरंडोल मतदारसंघाचे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले माजी आमदार हरिभाऊ महाजन यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले त्यावेळी नाशिक मधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय राऊत,धु ळे येथील शिक्षक सेलचे विलासराव पाटील ,जळगांव येथील ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस अशोक खलाने,,विजय महाजन,दिनेश माळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.