रांची – सराईकेला येथील कॉंग्रेसच्या जनआक्रोश मोर्चात लैला या डान्सरच्या डान्सने झारखंडचे राजकारण आता चांगलेच तापले आहे. त्यातच या नृत्याचा व्हिडिओ ट्विट करुन भाजप नेते कुणाल शाडंगी यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शाडंगी म्हणाले की, जनतेचा राग आता नियंत्रणात नाही. अशा प्रकारे सर्वांनी गाणी, संगीत आणि नृत्य यांच्या जल्लोषाने सर्वच नागरिक हादरले आहेत. तर काँग्रेस समोर संकट उभे आहे. आता तर सर्वजण इंटरनेटवर व्हिडिओ दाखवून कॉग्रेस विरोधात वातावरण तापविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
दिल्लीतील भाजपाच्या लोकांनाही असे वाटत असावे की, आता हा राग थांबणार नाही. तर दुसरीकडे काँग्रेसचे लोक म्हणतात की, विरोधकांना पोटदुखी असते. त्यांना हे देखील समजत नाही की, आम्ही प्रतिभावान कलाकारांना त्यांच्या स्टेजवरुन संधी देत आहेत. यात काय चुकीच आहे, भाजपाच्या सरकारमध्ये त्यांनी सर्वांना उपजीविकेचे वचन दिले होते, आता ते आम्ही पूर्ण करीत आहोत.
बघा लैलाच्या डान्सचा व्हिडिओ
https://twitter.com/KunalSarangi/status/1363169133207035913