नाशिक – महाराष्ट्र प्रदेश कॅांग्रेस कमिटी अंतर्गत राज्यस्तरीय उद्योग व वाणिज्य विभागाच्या अध्यक्षपदी नाशिकचे उद्योजक रमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.काँग्रेस पक्षाच्या स्थापनादिनी २८ डिसेंबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मुख्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश कॅांग्रेस कमिटी अध्यक्ष व राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे हस्ते रमेश पवार यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर बाळासाहेब थोरात, माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश कॅांग्रेस कमिटी सरचिटणीस मोहन जोशी, नाशिक शहर जिल्हा कॅांग्रेस कमिटी अध्यक्ष शरद आहेर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी रमेश पवार म्हणाले की उद्योग व वाणिज्य विभागाचे कामकाज प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात व प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व जिल्ह्यात सुरु करण्यात येईल.
याप्रसंगी थोरात यांचे हस्ते सांस्कृतिक विभागाचे अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र विद्याताई कदम व पर्यावरण विभागाचे अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र समीर वर्तक यांना देण्यात आले. याप्रसंगी ठाणे, नाशिक व बिड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमास उद्योजक, व्यापारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.