नवी दिल्ली – अभिनेत्री खुशबू सुंदर यांची कॉंग्रेसपक्षाच्या प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. खुशबू सुंदरने सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. पुढील वर्षीच्या तामिळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना संधी दिली जाऊ शकते. सुंदर यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना राजीनामा पत्र पाठला होता. त्यात त्यांनी काँग्रेसमधील उच्च स्तरावर बसलेल्या काही नेत्यांचे लोकमान्यतेशी संबंध नसून, प्रामाणिकपणे काम करण्याची संधी हिसकावल्याचे त्यांनी म्हटले आहे. २०१४ पासून सुंदर काँग्रेस पक्षाशी जोडल्या गेल्या होत्या मात्र आता प्रवक्ते पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. २०१८ सालच्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्यावेळी स्टार प्रचारक म्हणून त्यांनी काम पहिले होते. त्यावेळी महिला आरक्षणाचा मुद्दा संसदेत मांडणारा काँग्रेस पक्ष एकमेव असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते.