चांदवड – दहावा मैल ओझर येथे कविता आणि पुस्तकांच्या सानिध्यातील गणराय सध्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. अक्षरबंध प्रकाशनचे प्रकाशक प्रवीण जोंधळे यांनी गणेशाची ही आकर्षक आरास साकारली आहे.
ओझर पासून तीन किलोमीटर अंतरावर दहावा मैल आहे. तेथील हॉटेल रिलॅक्स कॉर्नर मध्ये विराजमान झालेले अनोखे बाप्पा सध्या विशेष चर्चेत आहेत. कवी व चित्रकार विष्णू थोरे यांनी साकारलेली अक्षरचित्रे पोस्टर रुपात तेथे लावण्यात आली आहेत. येय़े येणाऱ्या ग्राहकांना टेबलवर वाचनासाठी पुस्तके ठेवण्यात आली आहेत. लेखक सप्तर्षी माळी यांची कन्या वैष्णवी हिने साहित्य चळवळीला अनुसरून बाप्पांचा देखावा जिवंत केला आहे. शाडू मातीची बोलकी मूर्ती तिने साकारली. मूर्तीला अनुसरून अक्षय, अथर्व आणि अवनीने आज पर्यंत प्रकाशित झालेली सर्व अक्षरबंध प्रकाशनाची पुस्तके देखावा म्हणून मांडली आहेत. ही साहित्य आरास अतिशय देखणी झाली आहे.
खूपच छान
व्वा क्या बात है सरजी