नाशिक – ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील लोकप्रिय व्यासपीठ कविकट्टा सभामंडपातील काव्यदर्शन मध्ये विविध प्रसिध्द कविंच्या गाजलेल्या कवितांची पर्वणी रसिकांना अनुभवायास मिळणार आहे तसेच त्याला कॅलिग्राफीची जोड असल्याने ते कविकट्टाचे आकर्षण ठरणार आहे. कविकट्टा साठी कवितेचा ओघ दिवसेंदिवस वाढत असून आजपर्यंत कवितानी १८०० चा आकडा पार केला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, कविकट्टाचे प्रमुख राजन लाखे, महामंडळाचे कार्यवाह दादा गोरे, कोषाध्यक्ष रामचंद्र काळोखे, ग्रंथ प्रदर्शन समिती सदस्य के. एस अतकरे, सुनिताराजे पवार, समन्वयक संतोष वाटपाडे उपस्थीत होते. सदर बैठकीत कवितेच्या निवडीबबातचे निकष, काव्यदर्शन आकर्षण करण्याबाबत चर्चा, नेटके आणि नेमके सुत्रसंचालन, निवड होणा-या कविंचे वेळापत्रक, इत्यादी बाबत सखोल चर्चा होऊन शिस्तबद्ध होण्यासाठी नियोजनावर भर देण्यात आला.