कळवण – तालुक्यातील ग्रामपंचायतींकरीता सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठी महिला सरपंच पद आरक्षण घोषित
करण्यात आले. ही आरक्षण सोडत मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कळवण (मानुर) येथे पंचायत समिती सभागृहात सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली.
कळवण तालुक्यात ८६ ग्रामपंचायती असून कळवण तालुका हा संपुर्णत: अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट असल्यामुळे ८६ ग्रामपंचायतीची सरपंच पदे हे अनुसूचित जमातींच्या व्यक्तींकरीता राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यापैकी ५० टक्के सरपंचपदे ही महिलांसाठी आरक्षित करावयाची असल्याने ४३ ग्रामपंचायतींसाठी महिला सरपंच पदे आरक्षित करण्यात आली आहेत.
महिलांसाठी आरक्षित केलेल्या ग्रामंपचायती – कोसुर्डे, पिळकोस, मानुर,भादवण, पाळे खु, वाडी बु,कुंडाणे (ओ) निवाणे,सुळे,देसगांव, शिंगाशी, चणकापुर, हिंगवे, वेरुळे, खिराड, खर्डेदिगर, पुनदनगर, ओतुर, मोहमुख, मेहदर, मोहनदरी, बिलवाडी, अभोणा,कुंडाणे (क),जामलेवणी, विरशेत, तताणी, मुळाणेवणी, देवळीवणी,बोरदैवत, पळसदर, सावकीपाळे, वडाळे (हा). वडाळेवणी, नवीबेज, पाटविहीर, नाकोडे, गणोरे, दरेभणगी, मोकभणगी, भैताणेदिगर,रवळजी, मळगांव बु. आदी ग्रामपंचायतचा समावेश आहे.