१५ जानेवारीला मतदान अभोणा, कनाशी, पाळे बु, सप्तश्रुंग गड, ओतूर येथील निवडणुकांवर सर्वाधिक चर्चेच्या
कळवण – कळवण तालुक्यातील अभोणा, कनाशी, पाळे बु, सप्तश्रुंगी गड, ओतूर यांच्यासह कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतच्या निवडणुक कार्यक्रम घोषित झाल्याने रणधुमाळीला तालुक्यात प्रारंभ झाला असून ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी गटातटात, भाऊबंदकीच्या संशय कल्लोहाळात निवडणूक होणार आहे.
या पार्श्वभूमीवर गावाचा विकास करण्यासाठी ग्रामस्थांमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये यासाठी गावाची ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्यासाठी स्थानिक पातळीवर जेष्ठ मंडळी प्रयत्नशील असून युवा वर्गात मात्र निवडणूक लढविण्यासाठी बळ दिले जाणार असून गावागावात आता गटातटाचे राजकारण होणार आहे.
कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे. तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
ग्रामीण व आदिवासी भागात निवडणुकीत चुरस
कळवण तालुक्यातील अभोणा, कनाशी, ओतूर, पाळे बु, सप्तश्रुंगी गड, नांदुरी, मेहदर, नरुळ, भुसणी, मुळाणेवणी, बापखेडा, तताणी, मोहनदरी, भगुर्डी, पळसदर, मोहमुख, ओझर, लिंगामे, विरशेत, वडाळे(हा), बोरदैवत, जामलेवणी, कळमथे, सावकीपाळे, बिलवाडी, देवळीवणी, कुंडाणे(क), काठरे, गोसराणे या महत्वपूर्ण गावांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
नामनिर्देशनपत्रे ३० डिसेंबरपर्यंत तर १५ जानेवारीला मतदान –
कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे २३ ते ३० डिसेंबर २०२० या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी ३१ डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे ४ जानेवारी २०२१ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. तर मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होईल.
२५ सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार-
विधानसभा मतदारसंघाची २५ सप्टेंबर २०२० रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ७ डिसेंबर २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या १४ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.