–भुसणी व तताणी ग्रामपंचायत बिनविरोध
– २३ ग्रामपंचायतमधील ८४ जागा बिनविरोध
कळवण – कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतपैकी भुसणी व तताणी ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून सप्तश्रुंगी गड, अभोणा, कनाशी, वडाळे (हातगड) ग्रामपंचायत व्यतिरिक्त २३ ग्रामपंचायतमधील ८४ जागा बिनविरोध करण्यात स्थानिक नेत्यांना यश आले आहे. २९ ग्रामपंचायत मधील ६०१ इच्छुकापैकी ११८ इच्छुकांनी माघार नोंदवल्याने १०२ जागा बिनविरोध झाल्या असून त्यात तताणी व भुसणी ग्रामपंचायतचा समावेश आहे. २७ ग्रामपंचायतच्या १५९ जागांसाठी ३७६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे.
बापखेडा ग्रामपंचायतच्या ८ इच्छुकांनी माघार नोंदवल्याने ८ जागा बिनविरोध झाल्या असून ३ जागांसाठी ५ उमेदवार रिंगणात आहे. काठरे दिगर ग्रामपंचायतच्या ५ इच्छुकांनी माघार नोंदवल्या असून १ जागा बिनविरोध झाल्या असून ८ जागांसाठी २० उमेदवार रिंगणात आहे. सप्तश्रुंगी गड ग्रामपंचायतच्या ७ इच्छुकांनी माघार नोंदवल्याने अजून ९ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात आहे.
मोहनदरी ग्रामपंचायतच्या २ जागा बिनविरोध झाल्या असून ९ जागांसाठी २१ उमेदवार रिंगणात आहे.कनाशी ग्रामपंचायतच्या १५ इच्छुकांनी माघार नोंदवल्याने १३ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात आहे.नरूळ ग्रामपंचायतच्या ३ इच्छुकांनी माघार नोंदवली असून ५ जागा बिनविरोध झाल्या असून ६ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहे.
बिलवाडी ग्रामपंचायतच्या २ इच्छुकांनी माघार नोंदवल्याने ४ जागा बिनविरोध झाल्या असून ३ जागांसाठी ५ उमेदवार रिंगणात आहे.
अभोणा ग्रामपंचायतच्या २३ इच्छुकांनी माघार नोंदवल्याने १३ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात आहे.कुंडाणे (क) ग्रामपंचायतच्या ८ इच्छुकांनी माघार नोंदवल्याने ८ जागा बिनविरोध झाल्या असून १ जागांसाठी ३ उमेदवार रिंगणात आहे.जामले वणी ग्रामपंचायतच्या ३ इच्छुकांनी माघार नोंदवल्याने ९ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात आहे. विरशेत ग्रामपंचायतच्या ८ जागा बिनविरोध झाल्या असून १ जागांसाठी ४ उमेदवार रिंगणात आहे.
नांदुरी ग्रामपंचायतच्या ५ इच्छुकांनी माघार नोंदवल्या असून २ जागा बिनविरोध झाल्या असून ७ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहे.गोसराणे ग्रामपंचायतच्या ३ इच्छुकांनी माघार नोंदवल्याने ६ जागा बिनविरोध झाल्या असून ३ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहे. भुसणी ग्रामपंचायतच्या ३ इच्छुकांनी माघार नोंदवल्याने ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून कळमथे ग्रामपंचायतच्या २ इच्छुकांनी माघार नोंदवली असून ३ जागा बिनविरोध झाल्या असून ४ जागांसाठी ९ उमेदवार रिंगणात आहे.
मुळाने वणी ग्रामपंचायतच्या २ जागा बिनविरोध झाल्या असून ५ जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात आहे.देवळी वणी ग्रामपंचायतच्या एका इच्छुकांनी माघार नोंदवली असून ५ जागा बिनविरोध झाल्या असून ४ जागांसाठी ८ उमेदवार रिंगणात आहे. बोरदैवत ग्रामपंचायतच्या ६ इच्छुकांनी माघार नोंदवली असून ४ जागा बिनविरोध झाल्या असून ३ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहे. ओझर ग्रामपंचायतच्या ४ इच्छुकांनी माघार नोंदवली असून १ जागा बिनविरोध झाल्या असून ६ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहे. पळसदर ग्रामपंचायतच्या २ इच्छुकांनी माघार नोंदवली असून १ जागा बिनविरोध झाल्या असून ८ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहे.भगुर्डी ग्रामपंचायतच्या ४ इच्छुकांनी माघार नोंदवली असून ७ जागा बिनविरोध झाल्या असून २ जागांसाठी ४ उमेदवार रिंगणात आहे.सावकीपाळे ग्रामपंचायतच्या १ इच्छुकांने माघार नोंदवली असून २ जागा बिनविरोध झाल्या असून ५ जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहे.लिंगामा ग्रामपंचायतच्या २ इच्छुकांनी माघार नोंदवली असून ३ जागा बिनविरोध झाल्या असून ६ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहे.
वडाळे हातगड ग्रामपंचायतच्या एका इच्छुकांने माघार नोंदवली असून ९ जागांसाठी १९ उमेदवार रिंगणात आहे.