श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कळवण-सुरगाणा तालुक्यातील साठवण तलाव व को.प.बंधारे या योजनांबाबत मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, कळवण-सुरगाणा तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेतील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या प्रकल्पांसाठी आदिवासी विकास विभागाकडून निधी प्राप्त व्हावा यासाठी आदिवासी विकास मंत्री आणि राज्यमंत्री, जलसंधारण आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव यांची संयुक्त बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेणार असल्याचे माहिती त्यांनी दिली. तसेच तालुक्यातील उर्वरीत १० लघु पाटबंधारे प्रकल्पांचे अंदाज पत्रक सादर करण्याचे निर्देश भरणे यांनी दिले.
आदिवासी क्षेत्राच्या सिंचन विकासाच्या योजनांसाठी जलसंधारणासह आदिवासी विकास विभागानेही निधी उपलब्ध करुन दिल्यास आगामी काळात क्रांती होईल, अशी भावना श्री.भरणे यांनी व्यक्त केली.
या बैठकीला आमदार नितीन पवार, प्रधान सचिव नंदकुमार, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी व्ही. देवराज, जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक वि.क नाथ, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रविण खेडकर यांच्यासह आदी उपस्थित होते.