दिंडोरी लोकसभा महिला संपर्कप्रमुख डाॕ.स्नेहल मांडे यांनी केले मार्गदर्शन
कळवण – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर, ठाकरे सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे.अशी जनतेची भावना झाली आहे.यामुळेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे आदेशाने राज्यातील महिलांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी संपुर्ण जिल्ह्याच्या महिला संपर्कप्रमुख विधानसभानिहाय दौरा करत आहेत,याच पार्श्वभूमीवर कळवण सुरगाणा मतदार संघातील महिला आघाडीचा संयुक्तिक मेळावा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख डाॕ.स्नेहल ताई मांडे यांचे अध्यक्षतेखाली आरटीओ चेक नाका,घागबारी येथे घेण्यात आला.
यावेळी सुरगाणा तालुकाप्रमुख मोहन गांगुर्डे यांनी आपल्या सुरगाणा तालुक्यातील जिव्हाळ्याचा पाणी व आरोग्य याविषयी प्रश्नांची मांडणी करुन हे प्रश्न मुख्यमंत्री साहेबांकडे सांगण्यास विंनती करुन,गेल्या चाळीस वर्षापासुन माकपच्या ताब्यात असल्यामुळे हा तालुका या समस्यांनी कसा वेढला गेला आहे हे विषद केले .
महिला आघाडी संपर्कप्रमुख मांडे ताई यांनी सुध्दा आश्वासित केले की,तुमच्या समस्या नक्कीच मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जातील तसेच उपस्थितीत महिलांना बचत गटाच्या माध्यमातून काय कामे केली जातात,शासनाच्या योजनांची माहिती दिली, पाणी व आरोग्य हे प्रश्न लवकरच पक्षप्रमुख यांचे पर्यंत जातील असे मार्गदर्शनात सांगितले.
यावेळी उपस्थितीत महिलांनी आपल्या समस्या सांगितल्या महिला आघाडी तालुका संघटक सुशिला चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सत्यवती आहेर यांनी बचत गटास येणाऱ्या अडचणी मांडल्या
महिला आघाडी मेळाव्यास ग्रामिणच्या जिल्हा संघटक मंगलाताई भास्कर, कळवण तालुका महिला संघटक प्रितीताई मेणे,सुरगाणा शहर संघटक सिमा परदेशी,युवासेना जिल्हा अधिकारी आदित्य केळकर,उपजिल्हाप्रमुख योगेश वार्डे,सोशलमिडीया जिल्हाप्रमुख ललित आहेर,उपतालुकाप्रमुख एकनाथ भोये,सुषमा गांगुर्डे, लहाणी धुळे, योगीता गावित ,संगीता गायकवाड, विठा गांगुर्डे ,सिंधु जाधव, प्रभा वाघ, अरुणा पवार ,वैशाली धुळे, जया गांगुर्डे, नर्मदा धुळे ,यासह बचत गटाच्या अध्यक्ष व प्रतिनीधी यांच्यासह महिला उपस्थितीत होत्या.