कळवण व्यापारी महासंघाच्या कार्यक्रमात घोषणा …
कळवण – सध्या ऑनलाईन व्यापारामुळे स्थानिक व्यापारी बांधवांच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याची व्यापारी बांधवांनी व्यक्त केलेली खंत चिंतनीय असून स्थानिक व्यापारी संकटात सापडले आहेत, मी नेहमीच व्यापारी बांधवांच्या सोबत असून त्यांनी देखील सदैव साथ दिली आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या मागणीची दखल घेणे माझे कर्तव्य आहे.व्यापारी महासंघाने कळवण शहरात व्यापारी भवनची केलेली मागणी रास्त असून त्यासाठी आपण २१ लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे आश्वासन कळवण-सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी व्यापारी महासंघाच्या कार्यक्रमात दिली.
कळवण व्यापारी महासंघातर्फे दिनदर्शिका प्रकाशन,सत्कार समारंभ व व्यापार विषयक व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन हरी ओम लॉन्स येथे करण्यात आले होते.यावेळी आमदार नितीन पवार बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ.भारती पवार,महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा,उपाध्यक्ष अनिल लोढा,सुधीर डागा ,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहनलाल संचेती,उपाध्यक्ष जयंत देवघरे,नगरपंचायत गटनेते कौतिक पगार, जेष्ठ विधीज्ञ शशिकांत पवार,बेबीलाल संचेती,धनंजय पावर,राजेंद्र भामरे,सुनील महाजन, जेष्ठ विधीज्ञ परशुराम पगार,अशोक पवार,संजय मालपुरे,कारभारी आहेर,नारायण हिरे, दीपक खैरनार,गोविंद कोठावदे,के.के.शिंदे उपस्थित होते.
खासदार डॉ. भारती पवार यांनी सांगितले की राज्यातील व्यापारी बांधवांच्या समस्या केंद्र सरकारकडे मांडणार असून स्थानिक व्यापाऱ्यांची स्थानिक जनतेशी पूर्वीपासून नाळ जुडलेली असल्याने मोठमोठ्या कंपन्या स्थानिक व्यावसायिकांच्या व्यवसायांवर परिणाम करत असल्याचे केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी सुधीर डागा यांनी मॉल संस्कृती व ऑनलाईन व्यापार या विषयावर व्हिडीओ प्रोजेक्टरद्वारे मार्गदर्शन केले.महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे संतोष मंडलेचा यांनी राज्यभरातील व्यापारी बांधवांच्या समस्या मांडल्या.व्यापारी महासंघाचे मोहनलाल संचेती यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.कळवण शहर व्यापारी महासंघातर्फे विविध मागण्यांचे निवेदन खासदार डॉ.भारती पवार व आमदार नितीन पवार यांना देण्यात आले.व्यापारी महासंघाचे संचालक दीपक महाजन यांना कलादर्पण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विलास शिरोरे यांनी केले.सुत्रसंचालन राकेश हिरे यांनी केले.आभार व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष जयंत देवघरे यांनी मानले.
यावेळी कुमार रायते,रंगनाथ देवघरे,चंद्रकांत कोठावदे,विजय बधान ,प्रकाश संचेती,श्रीकांत मालपुरे,दीपक महाजन,राजेंद्र अमृतकर,नितीन वालखडे ,कैलास पगार,लक्ष्मण खैरनार,निलेश दुसाने,हेमंत कोठावदे,उमेश सोनवणे,संदीप पगार,सागर खैरनार उपस्थित होते
कळवण शहरात होणार व्यापारी भवन
व्यापारी महासंघाच्या मागणीनुसार कळवण शहरात व्यापारी भवनसाठी नगरपंचायतच्या माध्यमातून गटनेते कौतिक पगार यांनी जागा उपलब्ध करून दिली असून आमदार नितीन पवार यांनी २१ लाख रुपये निधी देण्याचे जाहीर केल्याने आगामी काळात कळवण शहरात व्यापारी भवन साकारले जाणार आहे.