कळवण – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत परीपत्रक जाहिर केले व त्यानुसार राज्यातील अत्यावश्यक सेवा व्यापारबंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.लॉकडाउनमुळे आधीच अडचणीत आलेला व्यापारी वर्ग आता स्थिरावत असतांना सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील व्यापारी वर्ग संपुर्णतः कोलमलडुन जाईल .त्यामुळे ब्रेक द चेन मध्ये अत्यावश्यक सेवा वगळता बंद करण्यात आलेला सर्व व्यापार सुरू करावे अशी मागणी
कळवण व्यापारी महासंघाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद केले आहे की,आतापर्यंत सरकारच्या प्रत्येक निर्णयात व्यापारी वर्गाने संपुर्ण सहकार्य केले आहे . आठवडयातील शनिवार व रविवार असे दोन दिवस बंद ठेवून व नियमांचे पालन करत व्यापारी सरकारला सहकार्य करत आहे . मात्र ३० एप्रिल २०२१ पर्यंत व्यापार बंद ठेवणे हे व्यापाऱ्यांसाठी अशक्य आहे . तसे केल्यास व्यापाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल तसेच त्याचा परीणाम व्यापारावरही होईल.शासनास मिळणाऱ्या विविध स्वरूपाच्या करांवरही होईल . व्यापाऱ्यांचे व त्यांच्यावर अवंलबुन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊन अनेक समस्यांना तोंड दयावे लागेल .महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स , इंडस्ट्री अँड ऍग्रिकल्चरच्या राज्यस्तरीय बैठकीत सरकारने ब्रेक द चेन च्या निर्णयाचा सकारात्मक विचार करून व्यापार सुरू करण्याचा निर्णय न घेतल्यास दोन दिवसानंतर सर्व व्यापार सुरू करणे व आंदोलनाची दिशा ठरविण्याच्या एकमताने घेतल्यास निर्णयाशी आम्ही सहमत राहून निर्णयात सहभागी होऊ असा इशारा देऊन व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन व्यापाऱ्यांचा सकारात्मक विचार करून सर्व व्यापार सुरु करण्याचा निर्णय घ्यावा व व्यापाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन कळवण व्यापारी महासंघाने केले आहे.
निवेदनावर कळवण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहनलाल संचेती, उपाध्यक्ष जयवंत देवघरे, सरचिटणीस विलास शिरोरे,खजिनदार कुमार रायते, संचालक रंगनाथ देवघरे, चंद्रकांत कोठावदे, विजय बधान, देविदास विसपुते, प्रकाश संचेती,श्रीकांत मालपुरे,प्रकाश पाटील, दीपक महाजन,राजेंद्र अमृतकार,नितीन वालखडे,कैलास पगार,लक्ष्मण खैरनार निलेश दुसाने,हेमंत कोठावदे, उमेश सोनवणे, संदीप पगार, सागर खैरनार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.