कळवण – कळवण,देवळा,सटाणा,मालेगाव तालुक्याचे कार्यक्षेत्र व प्रमुख अर्थकारण असलेला वसंतदादा पाटील सह.साखर कारखाना सभासद,ऊस उत्पादक,कामगार यांची संयुक्त विशेष सभा घेण्यास परवानगी मिळावी अशी मागणी
वसा का बचाव परिषदेचे निमंत्रक सुनील देवरे यांनी पुणे येथील राज्याचे साखर आयुक्त व सहकार आयुक्त यांच्याकडे केली आहे
वसाका कारखाना थकीत कर्जाच्या वसुलीसाठी राज्य सह.बँकेने जप्त केला असला तरी ही बँकेची अंतिम मालमत्ता नाही,बँकेने परस्पर कारखाना धाराशिव साखर उद्योग उस्मानाबाद यांना प्रदीर्घ कालावधी करिता भाडे तत्वावर चालावण्यास दिलेला आहे.महाराष्ट्र शासन नियुक्त प्राधिकृत मंडळ बरखास्त करण्यात आले असल्याने कारखाना व्यवस्थापनात सभासद प्रतिनिधी नाही,धाराशिव साखर उद्योगावर सभासदांचा विश्वास नाही,अवसायाक आपली जबाबदारी पार पाडण्यास असमर्थ ठरले आहेत.गळीत हंगाम यशस्वी करणे याबरोबरच आगामी धोरण सभासदांचा विश्वास,नवीन ऊस
लागवड,शासन व कारखाना प्रोत्साहन योजना,सभासदांना किफायतशीर दरात साखर, सुरू असलेले कामकाज,शंका इतर अडीअडचणी बाबत व्यवस्थापनाशी संवाद होणे करिता सभासद सभा होणे आवश्यक असल्याने सदर सभेस
परवानगी मिळावी सहकार विभागाने सभेस प्रतिनिधी नियुक्त करावा अशी मागणी देवरे यांनी केली आहे.
जप्ती आदेश मागे घ्यावा…
राज्य सह.बँकेने थकीत कर्ज वसुलीसाठी कारखाना मालमत्ता जप्त करून बँकेने परस्पर भाडे करार केला आहे.भाडे रक्कम कर्ज खात्यात जमा होत असताना बँकेने याचे नफा तोटा,ताळेबंद केला असेल यामुळे कारखाना मालमत्ता मुक्त करावी ,बँकेने जप्ती आदेश मागे घ्यावा..अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त केली आहे