शिक्षकच देशाला महासत्ता बनवतील – रोटरी गव्हर्नर शब्बीर शाकीर
….
कळवण – शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया असून शिक्षकांनी प्रतिकूल परिस्थितीत केलेले काम अतुलनीय आहे. यामुळे शिक्षकच देशाला महासत्ता बनवू शकतात. असा विश्वास रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शब्बीर शाकीर यांनी व्यक्त केला.
येथील हरी ओम मंगल कार्यालयात रोटरी क्लब ऑफ कळवण मार्फत ३४ शिक्षकांना नेशन बिल्डर्स अवाॅर्ड देऊन गौरवण्यात आले. त्याप्रसंगी शाकीर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नामदेवराव खैरनार तर प्रमुख अतिथी म्हणून रोटरीच्या डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी टाॅबी भागवाॅगर, अतुल शहा, शांताराम गुंजाळ, जितेंद्र कापडणे, मनीषा पवार, स्नेहल मालपुरे, प्रणाली शिरोरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना शाकीर म्हणाले की, या देशाला महिला आणि तरूणांच्या उर्जेसोबत सोबत शिक्षकांच्या मार्गदर्शनाची गरज असून देशसेवेसाठी शिक्षकांनी नोकरीसोबत समाजसेवेचे व्रत जोपासावे. याप्रसंगी पुरस्कारार्थीच्या वतीने सोनाली चव्हाण, कल्याणी देवरे, काशिनाथ सोनवणे, कल्पना पाटील, प्रभाकर निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी रोटरीयन विलास शिरोरे यांनी कळवण रोटरीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी निलेश भामरे यांनी, पाहुण्यांचे स्वागत रोटरीचे अध्यक्ष राजेंद्र मुसळे यांनी तर सूत्रसंचालन हेमंत सोनवणे यांनी केले.
कार्यक्रमास रोटरी सदस्य मोहनलाल संचेती, डॉ.समाधान सोनवणे, बापू कुमावत, गंगाधर गुंजाळ, कारभारी पगार, के. के. शिंदे, रवींद्र बोरसे,निलेश भामरे, सुचिता रौंदळ, निर्मला संचेती, मीनाक्षी मालपुरे, सुवर्णा पगार, आदिंसह रोटरी क्लब, रोटरॅक्ट क्लब, ईनरव्हिल क्लबचे पदाधिकारी व सदस्य, विविध संस्थेचे शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांना मिळाला पुरस्कार –
सोनाली चव्हाण, दिलीप शिसोदे, रामदास गायकवाड, शरद कोकणी, काशिनाथ सोनवणे, सोनाली वाघ, अविनाश लांडगे, कविता पवार, रामराज निकम, सावळीराम पालवी, मंगला गायकवाड, विश्वास चौधरी, माधुरी नागरे, सारिका कापडे, कल्याणी देवरे, किरण शिरसाठ, सत्येंद्र पवार, सतीष सागर, विकास रौंदळ, मनीषा आहेर, शामराव देशमुख, जी. आर. जाधव, मनीष देवघरे, कल्पना पाटील, हरिश्चंद्र आहेर, वसंत आहिरे, अनिल अमृतकर, रूपाली देसले, सुभाष भामरे, सुरेखा मराठे, सुभाष भामरे, पांडुरंग थैल, अपेक्षा शिरसाठ, जीवनगौरव पुरस्कार – के.के शिंदे, कारभारी पगार