कळवण – कळवण येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक शंकरराव त्र्यंबक देवरे यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या दोन दिवसापासून नाशिक येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर औषधोपचार सुरु होते. शुक्रवारी दुपारी १२ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. अत्यंत कडक शिस्तीचे शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती.आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. प्राथमिक शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले.भारतीय आयुर्विमा मंडळाचे त्यांनी अखेरपर्यंत काम बघितले. उत्कृष्ठ कार्याबद्दल आयुर्विमा मंडळाने त्यांचा गौरव केला.त्यांच्या पश्चात पत्नी,3 मुले, सुना, नातवंड, नातजावई, पणतू असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी बाळासाहेब देवरे,जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रविंद्र देवरे, जिल्हा परिषदेचे उपअभियंता यशवंत देवरे यांचे वडील होत.