कळवण – कळवण येथील उपजिल्हा रुग्णालय लसीकरण केंद्राला खा. डॅा. भारती पवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. ज्यांनी लसीकरण करून घेतले आहे अशा नागरिकांचीही भेट घेत त्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी त्यांनी येथील लसीकरणाचा आढावा घेतला.सुमारे दोन हजार नागरिकांना आता पर्यंत लसीकरण झाले आहे. जास्तीतजास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ निलेश लाड, डॉ प्रियांका जहागीरदार, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, सुभाष शिरोडे,प्रवीण रौऊदळ, एस. के पगार सर, काशिनाथ गुंजाळ, योगेश महाजन, रमेश पवार ,कुणाल कोठावदे, योगेश पवार, विलास थोरात, तेजस्विनी साबळे, वैभव काकुळते आदी उपस्थित होते
सध्या कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्याचा धोका हा दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे अनेक नागरिक संक्रमित होत आहेत . या संक्रमणाचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून सध्या केंद्रसरकार व राज्यशासनाच्या माध्यमातून लसीकरण अभियान देशभरात राबवले जात आहे. जेणेकरून प्रत्येक नागरिकाचे लसीकरण झाले पाहिजे असे खा. पवार यांनी सांगितले.