कळवण – कळवण तालुक्यात सहकार तत्वावर सर्वप्रथम स्थापन झालेल्या यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी कळवण शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी दिपक दत्तात्रेय अमृतकर, व्हाईस चेअरमनपदी विजय वालखडे जनसंपर्क संचालकपदी विष्णु महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पतसंस्थेच्या सभागृहात संस्थेचे मार्गदर्शक रविंद्र देवरे ,सार्वजनिक वाचानलायाचे अध्यक्ष परशुराम पगार,आदर्श शिक्षक के.के.शिंदे माजी सरपंच अरविंद कोठावदे यांच्या प्रमुख उपस्थित सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक गायकवाड यांच्या उपस्थितीत चेअरमन व व्हा चेअरमनपदासाठी संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली.
चेअरमनपदासाठी दिपक अमृतकर, व्हाईस चेअरमनपदासाठी विजय वालखडे जनसंपर्क संचालकपदासाठी विष्णु महाजन यांच्या नावाची सूचना माजी चेअरमन धीरेन पगार यांनी आणून नितीन कोठावदे यांनी अनुमोदन दिले. निर्धारित वेळेत एकमेव नामनिर्दर्शनपत्रे दाखल झाल्यामुळे बिनविरोध निवड झाली.
यावेळी डॉ.पी.एच.कोठावदे, सौ.प्रियाताई संचेती, राजेंद्र पवार ,जितेंद्र विसपुते ,संजय पवार,बुधा जाधव,नितिन कोठावदे,धिरेन पगार,फकिरा वाडेकर,सौ.अनिताताई महाजन पतसंस्थेचे व्यवस्थापक अजय येवले व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.