नाशिक – मुंबई – आग्रा महामार्गावरील गोंदे फाट्यावर गुरुवारी (१९ नोव्हेंबर) सकाळी साडेनऊच्या दरम्यान बसचा अपघात झाला. कळवणहून मुंबईकडे जातांना गोंदे फाट्याजवळ कळवण आगाराची एसटी बस (MH 14 BT 3802) या बसने पुढच्या अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली. यात बसमधील 20 ते 25 प्रवाशांच्या तोंडाला मार लागला. सर्वांना किरकोळ स्वरूपात मुका मार लागला. सुदैवाने बसचा वेग नियंत्रणात आल्याने मोठी जीवितहानी टळली. अपघाताची माहिती समजताच जगद्गुरु नरेंद्रा्चा्र्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती गुंड यांनी तात्काळ जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या अपघातातील जखमी असे
अरूण बाळु जाधव वय 46, संगीता अरूण जाधव वय 38, शुभम अरूण जाधव वय 19 रा. ठाणे, बबन शंकर गायकवाड वय 65 रा. गंगापुर गोंधळ राजीवनगर, वसंत दिलीप भोकरे वय 60, निलेश महाबली भंडारी वय 44, अनिता महाबली भंडारी वय 70 रा. नासिक उपनगर, अनिता आरेकर वय 56, उमेश लक्ष्मण खाडे वय 52 रा. कळवा ठाणे, दिलीप बाबुराव डावखरे वय 56 रा राजनंदन चौक पंचवटी, दिलीप मनोहर वानखडे वय 50 रा. यवतमाळ.
काही जखमींची नावे उपलब्ध झाली नाहीत. वाडीव-हे पोलिस पुढील तपास करीत आहेत.