कळवण – केंद्र सरकारने नव्याने मंजूर केलेल्या कृषी कायद्यामुळे कृषी व पणन कायद्यात बद्दल झाल्याने शेतकरी व कामगारांना उद्ध्वस्त करणारे असल्याने तातडीने नव्याने केलेला कायदा रद्द करावा तसेच राज्य शासनाने माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी या मागण्यांसाठी आज कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांनी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करुन राज्य सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान आजच्या लाक्षणिक बंदमुळे कळवण बाजार समितीची १ कोटी ६० लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारल्याने आज बाजार समितीमध्ये कांदा व धान्याचे लिलाव बंद असल्याने सर्वत्र सामसूम होती. केंद्र सरकारने कृषी व पणन कायद्यात केलेले बदल व नवीन कायद्यामुळे शेतकरी व कामगारांचे नुकसान होत आहे माथाडी कामगारांचे न्याय प्रश्न राज्य सरकारकडून सोडविले जात नसून कोरोनाच्या संकटात माथाडी कामगारांनी जीव मुठीत घेऊन नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या मालाची चढ-उताराची कामे केली काही कामगारांचा काम करताना कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाला माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळावी, माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करावी, माथाडी मंडळावर नोंदीत माथाडी कामगारांचे प्रतिनिधित्व द्यावे यासह विविध मागण्यांसाठी लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. कांदा-बटाटा भाजीपाला फळे माल सरकारच्या पणन विभागाने बाजार समितीच्या नियमणातुन मुक्त केला आहे त्यामुळे माथाडी कामगारांचे नुकसान होत आहे त्याकरिता हे नियम कायम करणे. माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुला-मुलींना काम करण्यासाठी संधी देणे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात विश्रांतीगृह पिण्याचे पाणी स्वच्छतागृह इतर प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे.
माथाडी कामगारांनी हक्काची कामे मिळण्या करिता पोलीस संरक्षण महिन्याची माथाडी ॲक्ट १९६९ मध्ये तरतूद करणे अथवा पोलीस यंत्रणेकडून संरक्षण मिळण्यासाठी परिपत्रक काढावे, माथाडी ॲक्ट १९६९ व विविध माथाडी मंडळाच्या योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी माथाडी कामगारांना हक्काची काम मिळण्यासाठी हक्काच्या कामात येणारे अडथळे दूर होण्यासाठी उपाय योजना करावी आदी १४ मागण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
यावेळी भिला काकुलते ,गोरख,देवरे,योगेश पवार,सुरज,पगार,ललित काकुलते,गिरीश पवार,लखन,कदम,नंदू आहेर ,कडू देवरे,दिलीप जाधव,मनोज आहेर,शशी पवार,योगेश बागुल, दिपक केदारे ,रावसाहेब आहेर,संजय पवार ,केवळ निकम,राकेश काकुलते, श्रीराम जाधव,प्रकाश रौदल,विजू देवरे,सोनू पगार,सोनू जाधव यांसह सर्व माथाडी कामगार उपस्थित होते.