कळवण- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कळवण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव व त्यांच्या पत्नी वर्षा बच्छाव यांनी बेज येथील जि.प शाळेत कष्टकरी मातांचा सन्मान करत महिला दिन साजरा केला.
कोरोना काळात कार्य करणाऱ्या आरोग्यसेविका,व अंगणवाडी ताई यांचा सत्कार करण्यात आला. केंद्रातील सर्व शिक्षिकांचाही सत्कार करण्यात आला.गावातील कष्टकरी मातांचा खास गौरव केला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केंद्रप्रमुख मराठे यांनी भूषविले. जयमाला देवरे,खैरनार सुनीता खैरनार,माधुरी नागरे यांनी मनोगत व्यक्त केले.जागतिक महिला दिनाची सुरुवात तसेच मातांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी ,किशोरवयीन मुलींना चांगले संस्कार द्या,कुटुंबाची काळजी घ्या व शिक्षणाला महत्व देऊन मुलींना पुढे आणा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव यांनी केले.वर्षा बच्छाव यांनी मातांशी सुसंवाद साधून नारी शक्तीचे महत्त्व सांगितले व स्त्रियांनी स्वतः ला कमी लेखू नका.आपले मत ठामपणे मांडायला शिका हा मंत्र दिला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी माधुरी नागरे ,अमोल सोनवणे,माधुरी भामरे,योगिता आहेर यांनी प्रयत्न केले.
यावेळी सुनीता जोपळे (आरोग्यसेविका),जयमाला देवरे (अंगणवाडी सेविका),नर्मदा शेवाळे (अंगणवाडी सेविका),मंगला पवार (अंगणवाडी सेविका),प्रतिभा पाटील,नलिनी सावंत,मंगल शेवाळे,सुनीता खैरनार,सुनीता शिवले,रुपाली पाटील,माधुरी नागरे,माधुरी भामरे,योगिता आहेर या शिक्षकांचा तसेच विजया गांगुर्डे,मंदा बोरसे,अनिता बर्डे,शोभा बर्डे, वंदना गांगुर्डे,इ. मातांचा गौरव करण्यात आला.कोरोना प्रादुर्भावामुळे सर्व नियम पाळून छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला.