नियमित योगा केल्याने मनावर व कार्यक्षमतेवर चांगला परिणाम- योगशिक्षक महाजन
कळवण – कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कळवण (मानूर) जि.नाशिक येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नाशिक व एस.के.डब्ल्यू महाविद्यालय सिडको आणि कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कळवण (मानूर) जि.नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने १५ दिवसीय बेसिक योग प्रमाणपत्र कोर्स या कार्यक्रमाचे उदघाटन योग शिक्षक जगन्नाथ महाजन यांच्या हस्ते करण्यात आले ,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.पगार तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा.राजेंद्र कापडे,प्रा.एस.एम.पगार व क्रीडा संचालक प्रा.हेमा मांडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कोर्सची रूपरेषा क्रीडा संचालक प्रा.हेमा मांडे यांनी मांडली. उदघाटनप्रसंगी योग शिक्षक जगन्नाथ महाजन यांनी सांगितले की, नियमित योगा केल्याने मनावर व कार्यक्षमतेवर त्याचा चांगला परिणाम होतो.योगाने मन एकाग्र करणे गरजेचे असून जेव्हा एखादे कार्य मनापासून करतो तेव्हा माणूस यशस्वी होतो.योग द्वारे दैनंदिन जीवन सहज आणि सोप्या पद्धतीने चांगले टेवून त्यासाठी जीवनात काही नियम पाळून व स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ देऊन आरोग्य विषयक जागृत राहणे गरजेचे आहे.आपले शरीर आपली जबाबदारी हि संकल्पना अंगीकृत करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.बी.एस.पगार म्हणाले यांनी सांगितले की ,मन एकाग्र करण्यासाठी मन,चित्त,शरीर स्थिर ठेऊन अनावश्यक विचार कमी करणे गरजेचे आहे.शरीराला प्राणवायूची आवश्यकता असून त्यासाठी सकाळी लवकर उठून निसर्गाच्या सानिध्यात फिरणे गरजेचे आहे.तसेच नियमित प्राणायाम व योग करणे गरजेचे असून त्यातून माणूस आनंदी व उत्साही राहून कार्यक्षमता वाढते तसेच रोज सकस आहार घेऊन योगाच्या माध्यमातून शरीर सुदृढ व सक्षम बनविणे गरजेचे आहे.त्यासाठी अश्या कोर्सचा मनापासून लाभ घ्या असे आवाहन केले.
या प्रसंगी १५ दिवसीय बेसिक योग प्रमाणपत्र कोर्सच्या विद्यार्थ्यांना टी शर्ट देण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.यु.के.पवार,प्रा.श्रीमती इंगळे, प्रा.श्रीमती कदम, प्रा.श्रीमती वृषाली पगार व बेसिक योग प्रमाणपत्र कोर्सचे विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा पाटीलने केले तर आभार प्रा.एस.एम.पगार यांनी मानले.