कळवण – कला,,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कळवण (मानूर) येथे क्रिडा विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागच्या वतीने फिट इंडिया विषयक मोहीम अंतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.पगार, उपप्राचार्य प्रा.राजेंद्र कापडे, कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.एम.पगार, विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख डॉ.एस.जे.पवार,क्रीडा विभाग प्रमुख प्रा.श्रीमती हेमा मांडे,प्रा.व्ही.एम.पगार ,प्रा.श्रीमती पूनम वाघेरे उपस्थित होते. फिट इंडिया जनजागृती रॅलीचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.पगार यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. या प्रसंगी प्राचार्य डॉ.बी.एस.पगार म्हणाले की,या कोव्हिड काळात नियमित व्यायाम व सकस आहार या माध्यमातून स्वत: फिट राहून आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्तीत जास्त या मोहिमे अंतर्गत सोशल मीडियाच्या माध्यमातून व प्रत्यक्ष जनजागृती करून समाज प्रबोधन करणे गरजेचे आहे.तसेच दररोज योगा,पायी चालणे, सायकलिंग करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. या मोहिमे अंतर्गत १ ते ३० डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी क्रीडा विभागाचे विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा यीजनेचे स्वयंसेवक तसेच महाविद्यालयातील शिक्षेक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .