नाविन्यपूर्ण उपक्रमाची संपूर्ण तालुक्यात चर्चा
कळवण – कळवण येथील भगवती प्रतिष्ठाणतर्फे दर वर्षी वेगवेगळ्या अशा सामाजिक कार्यातून शिवजयंती साजरी केली जात असते मात्र यंदा कोरोनाच्या महामारीमुळे शासनाचे सर्व नियम पळून एका चित्रफितीतून सोशल मिडीयाच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येकाने वाचला पाहिजे लिहिला पाहिजे या उद्देशातून प्रबोधन केले.
महाराष्ट्रात सुमारे ५५० पेक्षा जास्त गड किल्ले आहेत हे किल्ले म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान आहे. महाराष्ट्रातील लेण्या ,किल्ले मंदिरे,ही खरी महाराष्ट्राची संपत्ती आहे.आणि या संपत्तीचे जतन करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.त्याची ओळख वारसा आपल्याकडून देता आला पाहिजे यासाठी गडकोट आपण वाचविले पाहिजे यासाठी भगवती प्रतिष्ठाणने एक आगळावेगळा उपक्रम राबविला.
कळवण तालुक्याला ऐतिहासिक,सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे कळवण तालुक्याची एक आदीवासी तालुका म्हणून देखील आपली एक ओळख आहे. पण १६७० मध्ये हा प्रांत स्वराज्याला जोडला गेला त्यावेळच्या महत्वाच्या कळवणमधील अजंठा सातमाळ पर्वत रांगेत येतात त्यातील बरेचसे किल्ले हे यादव काळात बांधले गेलेलं आहेत.त्यात अंचला किल्ला,अहिवंत किल्ला,मोहंदरी किल्ला,सप्तशृंगी गड,चाचेर,मार्कंडेय,कन्हेर गड,हतगड,धोडप किल्ला रावळया-जावळया, कांचन-मंचन या अकरा किल्याची माहिती व सद्यस्थिती यांची माहिती यात दिली आहे. तर आपण या किल्याचे संगोपन कसे केला पाहिजे याची माहिती यातून देण्यात आली आहे.
गेल्या पाच वर्षापसून दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन येणाऱ्या या मंडळाची स्थापना १९ फेब्रुवारी २०१७ रोजी झाली असून मंडळाने आजपर्यंत सफाई कामगार,माजी सैनिक,पत्रकार,डॉक्टर,आरोग्य सेवक, रक्दान शिबीर असे उपक्रम राबविण्यात आले गेल्यावर्षी भगवती प्रतिष्ठाणतर्फे गावातील गरजू लोकांसाठी मोफत पाण्याचे टँकर पुरविण्यात आले. तर चालू वर्षी जगावर आलेल्या कोरोनाचे संकट लक्षात घेऊन सध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याचे ठरविले व चित्रफितीद्वारे कळवण मधील अकरा गडकिल्ल्याचा इतिहास व दर्शन कळवणकरांना करून दिले त्यामुळे भगवती प्रतिष्ठानची चर्चा सध्या संपूर्ण कळवणमध्ये सुरु असून निलेश पगार हे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून सेवाभावी काम करतात .