आमदार नितीन पवारांकडून वचननाम्याची वचनपूर्ती
….
कळवण – विधानसभेच्या निवडणुकीत आमदार नितीन पवार यांनी बाऱ्हे येथील 33/11 केव्ही उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लावून बाऱ्हे परिसरातील ४० गावांचा वीज प्रश्न सोडवून परिसरात सुरळीत वीज उपलब्ध करुन देऊ असे वचन दिले होते. आमदार नितीन पवारांकडून वचननाम्याची वचनपूर्ती होऊन बाऱ्हे येथील 33/11 केव्ही वीज उपकेंद्राला शासनाने मंजुरी दिल्यामुळे बाऱ्हे परिसरातील ४० गावातील वीजेचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे येथील 33/11 केव्ही विद्युत उपकेंद्राला शासनाने मंजुरी देऊन त्यासाठी आवश्यक असलेल्या ६.५ कोटी रुपयांपैकी पहिल्या टप्यात ४ कोटी रुपये निधीस जिल्हा वार्षिक योजनेतून आदिवासी उपाययोजना अंतर्गत प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे . लवकरच काम सुरू होणार असल्यामुळे परिसरातील ४० गावातील व खेड्यांना अखंडित व हक्काची वीज मिळणार आहे .
सुरगाणा तालुक्यात आजही बहुतांश खेड्यापाड्यांमध्ये २४ तास वीजपुरवठा नाही . या तालुक्यात असलेल्या सुरगाणा आणि बोरगाव या उपकेंद्रांना १३२ केव्ही दिंडोरी उपकेंद्रातून वीज पुरवठा जोडला आहे . ३३ के.व्ही.वाहिनीचे अंतर ६५ ते ७० कि.मी असल्याने सुरगाणा येथे कमी दाबाने वीजपुरवठा होतो . यामुळे बाऱ्हे व आजुबाजूच्या खेड्यांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा होण्यास अडचणी येतात.
जंगल परिसर असल्यामुळे पावसाळ्यात बहुतांश वेळा झाडे पडून , फांद्या तुटूननादुरुस्त वीजवाहिन्यांमुळे आठ -दिवस अंधारात व विजेशिवाय जगण्याची वेळ आदिवासी बांधवांवर येत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना आमदार नितीन पवार यांनी वीज पुरवठा सुरळीत करुन देण्याचा शब्द दिला होता त्यामुळे या भागातील वीजेच्या प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार , आदिवासी विकासमंत्री के . सी.पाडवी व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे पाठपुरावा करून बाऱ्हे येथे 33/11 केव्हीचे विद्युत उपकेंद्राची मागणी करून पाठपुरावा करुन मंजुरी मिळवली.महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी तांत्रिक मंजुरी दिली असून शासनस्तरावरून प्रशासकीय मान्यता देऊन पहिल्या टण्यात चार कोटी रुपयांचा निधी खर्चास प्रत्यक्षात मंजुरी दिली आहे . लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे .
बोरगावला अतिरिक्त रोहित्र लवकरच होणार कार्यान्वित–
गत १० वर्षांपासून बोरगाव व आजूबाजूच्या परिसरातील विजेची मागणी वाढल्याने बोरगाव उपकेंद्रात सध्यस्थितीत असणाऱ्या ५ मेगावॅटचे रोहित्र अतिभारीत होत होते . त्यामुळे कमी दाबाने वीजपुरवठा व वारंवार वीजपुरवठा खंडित होणे या समस्यांना वीज ग्राहकांना सामोरे जावे लागत होते. या ठिकाणी एक अतिरिक्त 5 मेगावॅटचे रोहित्र बोरगाव उपकेंद्रात जिल्हा आदिवासी उपाय योजनेत प्रस्तावित करण्यात आले होते . सदर रोहित्राचे काम पूर्ण झाले असून लवकरच कार्यान्वित होईल . त्यामुळे बोरगाव घाटमाथ्यावरील सर्व गावांना योग्य दाबाने व अखंडित वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे .