कळवण – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास आणि उद्यमशीलता विभाग भारत सरकार यांच्या विद्यमाने केंद्रीयमंत्री महेंद्रनाथ पांडे, राज्यमंत्री राजकुमार सिह यांच्या पुढाकाराने आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन खा.डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. भारतातील महिलांचे सक्षमीकरण व्हावे, या उदात्त हेतूने याउपक्रमाचे महिलांसाठीचे मार्गदर्शन शिबिर कळवण येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात महिलांना विविध रोजगार निर्मितीची माहिती व प्रशिक्षण दिले जाणार आहे. या शिबिरात पाककला प्रशिक्षण, टेलरिंग प्रशिक्षण, ज्वेलरी प्रशिक्षण यासह आदी विविध रोजगार उपलब्ध होणाऱ्या उपक्रमाचे महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. योजनेतील सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना खा.डॉ.भारती पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले .
२१ व्या शतकात भारतातील महिला या अधिक सशक्त, आत्मनिर्भर व्हाव्या, आपल्या कुटुंबाच्या, समाजाच्या तसेच देशाच्या सर्वांगीण विकासात महिलांचा सहभाग असावा म्हणूनच ही प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना महत्वपुर्ण आणि यशस्वी योजना असून ह्याद्वारे जास्तीत जास्त महिलांनी प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर बनावे असे प्रतिपादन खा.डॉ.भारती पवार यांनी उद्घाटन प्रसंगी केले.