कळवण – जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जिल्ह्यात आठवडे बाजार बंद केल्यामुळे या बाजारामध्ये खरेदी विक्री करुन उदारनिर्वाह अवलंबून असणाऱ्या नागरिकांचे जीवन फक्त आठवडे बाजारावर अवलंबून आहे. बाजार करणाऱयांना उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. आठवडे बाजार बंद असल्याने कुटुंबाची वाताहत झाली आहे. जगावे कसे हेच त्यांना उमजत नसल्याने नैराश्य आहे. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरनार यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना पत्र पाठवून व्यथा मांडल्या आहेत.
मा. जिल्हाधिकारी महोदय
नाशिक जिल्हा, नाशिक
विषय- आठवडे बाजार करणारे शेतकरी- शेतमजूर- किरकोळ व्यापारी- हमाल यांचे रोजी रोटी साठी आठवडे बाजार कोरोना चे नियम पाळून सुरू करणे बाबत
महोदय,
नाशिक जिल्ह्यातील कळवण-सुरगाणा-पेठ-दिंडोरी- नाशिक- निफाड-सिन्नर-इगतपुरी-त्रंबकेश्वर- येवला- नांदगाव-चांदवड-देवळा-मालेगाव- व बागलाण या तालुक्यात अंदाजे ५० हजार बाजार करणारे शेतकरी- शेतमजूर- कापड- रेडिमेड- धान्य- कडधान्य- मसाला- किराणा-भाजीपाला- मिठाई- फरसाण- कटलरी- बोंबील- बांगडी विक्रेते- फ्रुट स्टोल- बूट चप्पल- चांभार- शिराई- टोपली विक्रेते- इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक विक्रेते- प्लास्टिक- पण विक्रेते आदी किमान ७०० नागरिकांचे जीवन फक्त आठवडे बाजारावर अवलंबून आहे,बाजार करणाऱयांना उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही,आठवडे बाजार बंद असल्याने कुटुंबाची वाताहत झाली आहे.
जगावे कसे हेच त्यांना उमजत नाही, बँका- पतसंस्था व्याज थकले आहे,शालेय शिक्षण कसे करावे ? घरपट्टी- नळ पट्टी- वीज बिल कसे भरावे काहीही उमजत नाही. कोरोना या भीषण व भयावह नावाखाली मागचा पुढचा कोणताही विचार न करता आपण आठवडे बाजार क्षणात एका साहिनीशी आपण बंद केलेत, या बाजार करूंनी जगावे कसे हे मात्र आपण सांगितले नाही.कोरोनाचा प्रादुर्भाव आहे हे आम्ही पण जाणतो.पण त्यात आजाराने मरण्यापेक्षा भयानक यातना या बाजारावर अवलंबून असणार्याना सध्या भोगत आहोत.
आवण यातून मार्ग काढू शकतात.आठवड्याचे सर्वसाधारण ५ बाजार प्रत्येक तालुक्यात आहेत ! या वर उपजीविका करणारे अंदाजे एक लक्ष बाजार करू आहेत.
यांना जगण्याचे साधन नाही,आई भीक मागू देईना बाप खाऊ घालू देईना !अशी अवस्था या बाजार करूंची झाली आहे.आठवडे बाजार हा आमच्या बाप जाद्यांचा व्यवसाय आहे.घर- दार- प्रॉपर्टी- काहीही नाही.यांची मुले सामान्य शाळा कॉलेज मध्ये शिकत आहे,अत्यन्त गरिबीत हे भारतीय नागरिक हाल अपेष्टांचे जीवन जगत आहे !
आपण जिल्हाधिकारी आहात.आम्हाला पण जगण्याचा अधिकार आहे.आपण आम्हाला न्याय देऊ शकाल असा विश्वास अंदाजे ५० हजार बाजार करूंचा आहे.आपण या बाजार करणार्याच्या भावना समजून घ्याव्यात.जरी दररोज आठवडे बाजार भरणे आपल्याला योग्य वाटत नसल्यास आठवड्यातून किमान कोणत्याही 3 बाजार करण्यास आपण परवानगी द्यावी !
महोदय आपण आमच्या भावना समजून घ्याव्यात व सर्व आठवडे बाजार करणाऱ्या हातावर जगणाऱ्याना न्याय द्यावा विनंती
आठवडे बाजार करणा-यांच्या वतीने
नंदकुमार यशवंत खैरनार
कळवण जिल्हा नासिक
99609 12100