स्वयंस्फूर्तीचा केले होते लॉकडाऊन –
…
कळवण – नवीबेज कोरोना नियंत्रण समिती, ग्रामस्थ, आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासन यांनी हातात हात घेऊन एकदिलाने नवीबेज गाव लॉकडाऊन करण्याचा स्वयंस्फूर्तीने निर्णय घेतल्यामुळे अत्यावश्यक वगळता सर्व व्यवहार बंद झाले. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यात ग्रामस्थांना यश आले. कोरोना साखली तोडल्यामुळे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कौतुकाची थाप ग्रामस्थ, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या पाठीवर दिली.
नवीबेज कोरोना समितीचे अध्यक्ष घनश्याम पवार यांचा आदर्श लॉकडाऊन पॅटर्न जिल्ह्यात आदर्शवत ठरला असून जिल्ह्यातील गावांनी त्याचा आदर्श घेऊन नवीबेज पॅटर्न गावागावात राबविल्यास कोरोना साखळी तोडण्यात निश्चित यश येईल असा विश्वास शासकीय यंत्रणेने यावेळी व्यक्त केला.
नवीबेजची कोरोना बाधितची संख्या ८३ पर्यंत जाऊन पोहोचल्यामुळे दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या दिवसांगणिक वाढत असल्यामुळे कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या नवीबेज गावाला नाशिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी अचानक भेट देऊन प्रतिबाधित क्षेत्राची पाहणी केली. कळवण तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या रविंद्र शिंदे यांनी कळवण पंचायत समितीला भेट देऊन कोरोनाचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. मानूर कोविड सेंटर व नवी बेज येथे कॅन्टोन्मेंट झोनची पाहणी केली.
नवीबेजच्या गृह विलगीकरण असलेल्या रुग्णाच्या घरी जाऊन प्रत्यक्ष रुग्णाला भेटून चर्चा केली दैनंदिन आरोग्य कर्मचारी भेटी देतात का ? ऑक्सिजन तपासले जाते का ? औषधं दिली जातात का ? या बाबत विचारणा केली. कोरोना बाधित रुग्णानी दिलेल्या प्रतिक्रिया व १०० टक्के गाव लॉकडाउन असलेले बघून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांनी कोरोना समितीचे अध्यक्ष घनश्याम पवार, डॉ राजेश काटे,आरोग्य सेविका सुनीता जोपले,आरोग्य सेवक दादाजी गुंजाळ व आशा वर्कर सुनीता जाधव , ग्रामविकास अधिकारी सुधाकर देशमुख व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या कार्याचे कौतुक केले.
नवीबेज गावाला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुधीर पाटील यांनी वेळीवेळी भेट दिली.प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राजेश काटे,कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष घनश्याम पवार , पोलिस पाटील केदारे, क्षेत्र अधिकारी मकासरे , ग्रामविकास अधिकारी सुधाकर देशमुख, श्रीकांत पाटील, अशोक वळीकर आरोग्य विभागाचे आरोग्य सहाय्यक यांनी विशेष परिश्रम घेतलेत्यामुळे कोरोना बाधितांची रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यात यश आले.
…..
नवी बेज सारखे नियोजन इतर गावांनी करावे
बाधित रुग्ण व गावातील ग्रामस्थ यांनी कॅन्टोन्मेंट झोनच्या नियमांचे पालन केल्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मदत झाली. कोरोना नियंत्रण समिती,ग्रामस्थ ,आशा वर्कर , आरोग्य सेविका तसेच गाव पातळीवरील सर्व आरोग्य व इतर कर्मचारी यांनी एकजुटीने केलेल्या कामामुळे यश आले त्यामुळे ते सर्व कौतुकास पात्र आहेत. कोरोनाला वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी बेज सारखे नियोजन इतर गावांनी करावे
– रवींद्र शिंदे ,अति मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद नाशिक
…