कळवण – कळवणकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची दखल घेणाऱ्या श्री धनलक्ष्मी पतसंस्थेच्या वतीने कळवण नगरपंचायतचे स्वछतादूत ग्रामस्वच्छता कर्मचारी बंधू-भगिनींना थंडीपासून बचवासाठी ब्लॅंकेटचे वाटप व श्री धनलक्ष्मी दिनदर्शिका-२०२१ प्रकाशन सोहळा सोमवारी संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळवण तालुका सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष देविदास विसपुते होते. प्रमुख अतिथी म्हणून नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल,कमको बँकेचे चेअरमन सुनिल महाजन, कमको बँकेचे माजी चेअरमन संजय मालपुरे, शेतकरी सहकारी संघाचे माजी अध्यक्ष निंबा पगार, युवा उद्योजक भुषण पगार आदी उपस्थित होते.
संस्थेच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवणाऱ्या मान्यवरांनाही सन्मानित करण्यात आले. त्यात चेन्नईच्या शैक्षणिक संस्थेकडून पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कळवण महाविद्यालयाचे प्रा. डॉ. निंबा कोठावदे , पीएचडी मिळविणारे अभोणा महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रवींद्र पगार, नाशिक जिल्हा व्हॅल्यूअर संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हाद दुसाणे, कमकोचे स्विकृत संचालक अविनाश कोठावदे, मिलिंद मालपुरे आदींचा सन्मान करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री धनलक्ष्मी दिनदर्शिका-२०२१ चे प्रकाशन करण्यात आले. नगरपंचायतचे स्वच्छतादूत ग्रामस्वच्छता कर्मचारी बांधवांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. यावेळी कमकोचे संचालक प्रा डॉ निंबा कोठावदे यांनी संस्थेच्या माध्यमातून सतत अभिनव उपक्रम राबविले जातात हे सांगताना स्वच्छता कर्मचारी वर्गाला खऱ्या अर्थाने ऊब देण्याचे कार्य या ब्लॅंकेट वाटप कार्यक्रमाने झाल्याचे गौरवोद्गार काढले.
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांनी सांगितले की, स्वच्छतेला आपल्या सर्वांच्या जीवनात खूप महत्वाचे स्थान आहे. स्वच्छ भारत अभियानात प्रत्येकाने सहभागी होणे आवश्यक आहे. पतसंस्थेमार्फत सफाई कर्मचाऱ्यांना दिलेला हा मायेचा ओलावा यापुढेही कधी कमी पडू नये ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन दिपक महाजन,व्हा.चेअरमन कृष्णा पगार,मानद कार्यकारी संचालक बाळासाहेब खैरनार,जनसंपर्क संचालक योगेश अमृतकार, सेक्रेटरी,किशोर कोठावदे,सर्व पदाधिकारी, संचालक, सल्लागार मंडळ,तक्रार निवारण समिती सदस्य कर्मचारी वृंद,सभासद बांधव उपस्थित होते.