काँग्रेस, शिवसेना, भाजपा, माकपा यांचा देखील ग्रामपंचायतवर झेंडा फडकवला. सरपंच व उपसरपंच निवडणुकीत विरशेत येथे दोन गटात मारहाण व्यतिरिक्त सर्वत्र शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक संपन्न झाला.
कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंचपदाच्या झालेल्या निवडणूकीत कनाशी सरपंचपदी बंडू पवार , उपसरपंच सुनीता बोरसे , अभोणा सरपंचपदी सुनीता पवार , उपसरपंच भाग्यश्री बिरारी , ओतूर सरपंचपदी पार्वता गांगुर्डे , उपसरपंच मंगेश देसाई , मेहदर सरपंचपदी शहानू राऊत , उपसरपंच प्रकाश बंगाळ यांची निवड झाली.
मुळाणे सरपंचपदी पुष्पा ठाकरे , उपसरपंच – शांताराम ठाकरे , कळमथे सरपंचपदी अरुण वार्डे , उपसरपंच मनीषा वाघ , नांदुरी सरपंचपदी सुभाष राऊत , उपसरपंच ताराचंद चौधरी , बोरदैवत सरपंचपदी कविता चव्हाण , उपसरपंच रामदास गावित यांची निवड झाली. पाळे बु .सरपंचपदी नंदू निकम , उपसरपंच सुधीर परदेशी , देवळीवणी सरपंचपदी लताबाई चव्हाण , उपसरपंच पंकज चव्हाण , भुसणी सरपंचपदी सुकदेव पवार , उपसरपंच दीपक खैरनार , कुंडाणे(क) सरपंचपदी गौरी ठाकरे , उपसरपंच देवेंद्र ढुमसे , मोहमुख सरपंचपदी अनिता काळे , उपसरपंच भगवान जाधव यांची निवड झाली.
ओझर सरपंचपदी रमेश भोये , उपसरपंच धनश्री भोये , सावकी पाळे सरपंचपदी सुनीता बंगाळ , उपसरपंच रेखा गायकवाड , बिलवाडी सरपंचपदी मोहिनी साबळे , उपसरपंच माधव गायकवाड , काठरे दिगर सरपंचपदी विजय गायकवाड , उपसरपंच रत्ना भोये यांची निवड झाली. गोसराणे सरपंचपदी कैलास थैल , उपसरपंच मुरलीधर मोरे , भगुर्डी सरपंचपदी दत्तात्रेय गवळी , उपसरपंच आशा देवरे नरूळ सरपंचपदी प्रमिला भोये , उपसरपंच महादू चौधरी , तताणी सरपंचपदी वंदना राऊत , उपसरपंच भारती भोये , लिंगामे सरपंचपदी गुलाब पालवी , उपसरपंच राधाबाई पालवी यांची निवड झाली. वडाळा (हा ) सरपंचपदी सुवर्णा गावित , उपसरपंच पुंडलिक गावित , जामले ( वणी ) सरपंचपदी ललिता भरसट , उपसरपंच धनराज ठाकरे , मोहनदरी सरपंचपदी जयश्री चव्हाण , उपसरपंच कैलास चव्हाण , पळसदर सरपंचपदी उज्ज्वला कवर ,उपसरपंच छबूनाथ कवर बापखेडा सरपंचपदी सुनील चौधरी , उपसरपंच – जयश्री साबळे यांची निवड करण्यात आला.